आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

विपुल अमृतलाल शाह आणि झी स्टूडियोजची विद्युत जामवाल अभिनीत ‘सनक’ लवकरच डिज्नी+ हॉटस्टार मल्टीप्लेक्सवर होणार प्रदर्शित! (‘Sanak’ starring Vidyut Jammwal will soon release on Disney + Hotstar multiplex)

विपुल अमृतलाल शाह आणि झी स्टूडियोजचा बहुप्रतीक्षित चित्रपट, ‘सनक – होप अंडर सीज’ भारतातील सर्वात मोठ्या प्रीमियम ओटीटी मंचावर प्रदर्शित होणार आहे. कनिष्क वर्माद्वारे दिग्दर्शित, विद्युत जामवाल आणि बंगाली अभिनेत्री रुक्मिणी मैत्रा अभिनित हा चित्रपट लवकरच डिज्नी+ हॉटस्टार मल्टीप्लेक्सवर प्रदर्शित होणार आहे. या घोषणेसोबतच, निर्मात्यांनी एक नवे आकर्षक पोस्टरचे देखील अनावरण केले आहे ज्यामध्ये विद्युत हातामध्ये बंदूक घेऊन मिशनसाठी सज्ज झाला आहे.

विद्युत चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असून आपल्या करिअरमध्ये यशस्वी निर्माता विपुल शाह यांच्यासोबत हा 5वा चित्रपट आहे. काही महिन्यांआधी आलेल्या ‘सनक’ च्या आकर्षक पोस्टरने दर्शकांची मने जिंकली होती आणि आजच्या या नव्या पोस्टरने दर्शकांना उत्सुक केले आहे कारण ते आता पुढे येणाऱ्या रोमांचक ट्विस्टची वाट बघत आहेत.

विद्युत जामवाल, चंदन रॉय सान्याल, नेहा धूपिया आणि या चित्रपटाद्वारे बॉलीवुडमध्ये डेब्यु करणारी बंगाली अभिनेत्री रुक्मिणी मैत्रा अभिनीत, ‘सनक – होप अंडर सीज’ झी स्टूडियोजद्वारे सनशाइन पिक्चर्स प्राइवेट लिमिटेडच्या सहयोगाने प्रस्तुत करण्यात येत आहे. हा विपुल अमृतलाल शाह प्रोडक्शनचा चित्रपट असून याचे दिग्दर्शन कनिष्क वर्मा यांनी केले आहे. लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात येणार आहे.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.