सलमान खानचा ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ (Radhe: Your Most Wanted Bhai) हा जगातील अनेक प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारा पहिला बिग बजेट चित्रपट ठरणार आहे! ईदच्या रिलीजची परंपरा लक्षात घेऊन सलमान खान फिल्म्स आणि झी स्टुडिओज (Zee Studios) यांनी ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ या सिनेमासाठी एक मेगा रिलीज स्कीम शेअर केली आहे. प्रभु देवा दिग्दर्शित हा चित्रपट आता १३ मे २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर मल्टीफॉर्मेट वर व्यापक प्रमाणात  रिलीज होणार आहे. (Salman Khan’s Radhe: Your Most Wanted Bhai will release on both, the theatres and digital world on May 13). चित्रपटाचे ट्रेलर उद्या दि. २२ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. 

salman khan's radhe on eid

राधे आता जगभरातील चित्रपटगृहात रिलीज होईल जिथे सरकारने जारी केलेल्या कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले जाईल आणि झीच्या ‘पे पर व्ह्यू’ सेवा झी 5 (Zee5) वर आणि सर्व प्रमुख डीटीएच ऑपरेटर म्हणजेच डिश, डी 2 एच, टाटा स्काय आणि एअरटेल डिजिटलवर सुद्धा प्रेक्षक हा सिनेमा पाहण्यास सक्षम असतील ज्यात प्रेक्षकांना त्यांच्या सोयीनुसार चित्रपट पाहण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ या चित्रपटात सलमानबरोबर दिशा पटानी, रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ देखील आहेत. झी स्टुडिओच्या सहकार्याने हा चित्रपट सलमान खान फिल्म्सने सादर केला आहे. सलमा खान, सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित हा चित्रपट यंदा ईदच्या निमित्ताने १३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

हा चित्रपट कोविड प्रोटोकॉल थिएटरच्या अनुषंगाने सर्व भारतीय राज्यांतील थिएटरमध्ये उपलब्ध असेल. मध्य-पूर्व, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर, युरोप या सर्व देशांमध्ये प्रदर्शनाचे नियोजनदेखील केले जात आहे.  झी 5 वर चित्रपट ‘पे पर व्ह्यू’ सर्व्हिस झीप्लेक्स (ZeePlex) वर सुद्धा प्रेक्षकांना बघता येईल. शिवाय डिश, डी 2 एच, टाटा स्काय आणि एअरटेल डिजिटल टीव्ही सारख्या डीटीएच प्लॅटफॉर्मवर ग्लेप्लेक्स देखील उपलब्ध असेल. 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.