आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

आरएसवीपीने आपल्या होमग्रोन हॉरर-कॉमेडी ‘ककुड़ा’ या चित्रपटाची घोषणा केली असून रितेश देशमुख, सोनाक्षी सिन्हा आणि साकिब सलीम अभिनित या चित्रपटाचे शूटिंग आजपासून सुरू होणार आहे.(RSVP announces horror-comedy ‘Kakuda’, a direct-to-digital film directed by Aditya Sarpotdar)

‘ककुड़ा’ या चित्रपटातून आदित्य सरपोतदार हिंदीमध्ये आपले दिग्दर्शकीय पदार्पण करत असून या आधी त्यांनी प्रेक्षक आणि समीक्षकांनी गौरवलेले ‘क्लासमेट्स’, ‘मौली’ आणि ‘फास्टर फेणे’ सारखे चित्रपट दिले आहेत.

‘ककुड़ा’मध्ये कॉमेडी आणि स्पूक यांचे मिश्रण असून, एका गावाला मिळालेल्या विचित्र अभिशापाची ही कहाणी आहे. या इलेक्ट्रिफाइन्ग तिकड़ीचा सामना एका अशा भूतासोबत होतो, ज्याबरोबरच्या धम्माल रोलरकोस्टर प्रवासात अंधविश्वास, परंपरा आणि प्रेमावर देखील प्रश्नचिन्ह उभे राहते.

 

View this post on Instagram

 

A post shared by RSVP (@rsvpmovies)

चित्रपटाबाबत बोलताना, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणाले की, “मी रोनी स्क्रूवाला यांच्यासोबतच्या या सहयोगासाठी अतिशय उत्साहित आहे. हा चित्रपट इतर व्यावसायिक चित्रपटांच्या तुलनेत कणभरदेखील कमी नाही. कास्टिंग अतिशय चोख आहे आणि कथानक तुम्हाला तुमच्या खुर्चीला खिळवून ठेवेल आणि विचारप्रवृत्त करेल.”

रितेश देशमुख म्हणतो की, “मी सोनाक्षी आणि साकिबसोबत या चित्रपटात काम करण्यासाठी आणखी वाट नाही बघू शकत. मला स्वतःला हॉरर-कॉमेडी शैली आवडते आणि ‘ककुड़ा’ माझ्यासाठी एक घोस्टबस्टरचा भाग आजमावण्याची सुरेख संधी आहे.”

चित्रपटाचे लेखन जोडगोळी अविनाश द्विवेदी आणि चिराग गर्ग यांनी केले असून चित्रपटाचे एसोसिएट निर्माता सलोना बैंस जोशी यांच्याद्वारा विकसित करण्यात आली आहे.

‘ककुड़ा’ आरएसवीपीची प्रस्तुती आहे. या डायरेक्ट-टू-डिजिटल हॉरर-कॉमेडी चित्रपटाचे शूटिंग गुजरातच्या विविध भागात सुरू झाले असून 2022 च्या सुरुवातीला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – प्राजक्ता माळीचा ‘प्राजक्तप्रभा’ काव्यसंग्रह रसिकांच्या भेटीला

Website | + posts

Leave a comment