आता प्रतीक्षा संपली आहे. बहुचर्चित पॅन-इंडिया मल्टीस्टारर चित्रपट, आरआरआर १३ ऑक्टोबर २०२१ रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर जगभरात प्रदर्शित होईल. बाहुबलीचे दिग्दर्शक एस एस राजामौली यांचे दिग्दर्शन लाभलेला व ज्यू. एनटीआर आणि राम चरण अभिनीत आरआरआर सर्वत्र थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.

एनटीआर, राम चरण, अजय देवगन, आलिया भट्ट, समुथिरकानी आणि अ‍ॅलिसन डूडी यांच्यासह  इतर लोकप्रिय कलाकारांना घेऊन बनत असलेला, आरआरआर हा एक पिरियड चित्रपट आहे, ज्यात प्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानी कोमाराम भीम आणि अल्लूरी सीतारामाराजू यांच्या तारुण्यातील दिवसांचे काल्पनिक कथानक असणार  आहे.

याबद्दल बोलताना निर्माता डीव्हीव्ही दानय्या म्हणाले की, “आम्ही आरआरआर चे शूटिंग वेळापत्रक संपवत आलो आहोत आणि हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी खूप उत्सुक आहोत. प्रेक्षकांसह सिनेमागृहात दसऱ्यासारखा मोठा उत्सव साजरा करण्यास आम्ही खूप उत्सुक आहोत.”

डीव्हीव्ही एंटरटेनमेंट बॅनरखाली डीव्हीव्ही दानय्या निर्मित आरआरआर हा एक अखिल भारतीय चित्रपट आहे आणि तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि इतर अनेक भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Website | + posts

Leave a comment