जान्हवी कपूर लवकरच रसिकांना एका वेगळ्या अवतारात रसिकांना दर्शन देणार आहे. स्वतःच्या क्युट, इनोसंट अशा सॉफ्ट इमेजला ब्रेक देत जान्हवी कपूरने आगामी ‘रुही’ या सिनेमात एका अतृप्त आत्म्याच्या भूमिकेला साकार केले आहे. तिच्या सोबत आहेत राजकुमार राव व वरुण शर्मा.

roohi movie poster

स्त्री या कॉमेडी भयपटाच्या यशानंतर त्याच्याच निर्मात्या मंडळींनी राजकुमार राव यास नायक म्हणून कायम ठेवत रुही हा आगामी कॉमेडी भयपट आणला आहे जो ११ मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल. आज त्याचे ट्रेलर लॉन्च झाले असून सोशल मीडियावर त्यास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘इस बार मर्द को ज्यादा दर्द होगा’ अशी सिनेमाची उत्सुकता वाढविणारी टॅगलाईन आहे. ट्रेलर नक्कीच प्रभावी बनले आहे यात शंका नाही.

दिनेश विजन व मृगदीप सिंग लांबा निर्मित, रुही चे दिग्दर्शन हार्दिक मेहता यांनी सांभाळले असून सचिन-जिगर यांचे संगीत चित्रपटास लाभले आहे. जिओ स्टुडिओज तर्फे चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

बघा ट्रेलर इथे – 

 

Website | + posts

Leave a comment