सुभाष कपूर लिखित (जॉली एलएलबी फेम )आणि दिग्दर्शित व रिचा चड्ढा हिच्या प्रमुख भूमिकेत, राजकीय नाट्यावर आधारित आगामी सिनेमा “मॅडम चीफ मिनिस्टर” २२ जानेवारी २०२१ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल. रिचा चड्ढाने आज या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा ट्विटरवरून केली व सोबत सिनेमाचे पोस्टर सुद्धा रिलीज केले ज्यात रिचा हातात झाडू घेऊन उभी राहिलेली दिसत आहे. 

 

भूषण कुमार, कृष्ण कुमार, नरेन कुमार आणि डिंपल खरबंदा निर्मित या चित्रपटात सौरभ शुक्ला, मानव कौल, अक्षय ओबेरॉय व शुभ्राज्योती हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. गेल्या महिन्यात सिनेमा हॉलमध्ये दाखल झालेल्या शकीलानंतर, कोरोना व्हायरस महामारीच्या दरम्यान रिचा चड्ढा हिचा सिनेमागृहात प्रदर्शित होणारा ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ हा दुसरा सिनेमा असेल. उत्तर प्रदेशची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाचा पहिला लूक टी-सीरिजने सुद्धा  ट्विटरवर शेअर केला आहे. 

Website | + posts

Leave a comment