सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते रजनीकांत यांना २०१९ या वर्षासाठीचा सिनेसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके हा सन्मान जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून ही घोषणा केली आहे. अभिनय आणि चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात रजनीकांत यांनी दिलेल्या मोठ्या योगदानासाठी त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. हा सन्मान देण्यासाठी नेमलेल्या ज्युरींच्या सदस्यांमध्ये गायिका आशा भोसले, निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई, अभिनेते मोहनलाल, गायक शंकर महादेवन व अभिनेते विश्वजीत चॅटर्जी यांचा समावेश होता व सर्व सदस्यांनी रजनीकांत यांच्या नावासाठी एकमताने शिफारीश केली होती. 

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत हे भारतातील भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिळ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. रजनीकांत ह्यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळूर येथे एका महाराष्ट्रीय मराठा हेन्द्रे पाटील मराठा समाजात झाला. त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असून वडिलांचे रामोजीराव गायकवाड आणि आईचे जिजाबाई गायकवाड असे आहे. चित्रपटात काम करण्याच्या इच्छेमुळे एका मित्राच्या मदतीने ते चेन्नईला चित्रपटातील अभिनय शिकण्याकरीता गेले. मद्रास फिल्म इंस्टिट्यूटमध्ये अभिनयाचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी आपल्या अभिनयाची कारकीर्द १९७४-७५ मध्ये सुरू केली.

१९७५ साली त्यांनी अपूर्व राघंगल या तामिळ चित्रपटातून पदार्पण केले आणि नंतर असंख्य सुपरहिट सिनेमातून त्यांनी काम केले. रजनीकांत यांनी हम आणि चलबाजसारख्या अनेक बॉलिवूड हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

Website | + posts

Leave a comment