राम तेरी गंगा मैली, आसमाँ, जबरदस्त, एक जान है हम, जिम्मेदार, जलजला, अंगारे, लव्हर बॉय, लावा, प्रीती, मेरा साथी  सारख्या चित्रपटांमधील अभिनयासाठी ओळखले जाणारे, शो मॅन राज कपूर यांचे चिरंजीव ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचे आज ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. अभिनेते ऋषी कपूर व रणधीर कपूर यांचे ते लहान भाऊ होत. चेंबूर येथील इंलॅक्स इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रणधीर कपूर यांनी भावाला तातडीने जवळच्या इस्पितळात भरती केलं, पण उपचार सुरू करण्यापूर्वीच राजीव कपूर यांचं निधन झालं होतं.रणधीर यांनी स्वतः राजीव यांचं निधन झाल्याचं सांगितलं. भावाच्या निधनाबद्दल रणधीर म्हणाले की, ‘आज मी माझ्या छोट्या भावाला राजीवला गमावलं. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. पण त्याचे प्राण वाचवू शकले नाही. पुढील सर्व कामांसाठी आता मी इस्पितळातच आहे.’ 

rajiv kapoor with rishi and randhir kapoor

 

राजीव कपूर यांचा जन्म २५ ऑगस्ट १९६२ रोजी मुंबईत झाला. १९८३ साली एक जान है हम या सिनेमाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘प्रेमग्रंथ’ सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं. आ अब लौट चले, प्रेमग्रंथ व हिना या चित्रपटांची निर्मिती राजीव कपूर यांनी केली होती. प्रेम रोग व बीवी ओ बीवी या सिनेमांचे सहाय्यक दिग्दर्शन त्यांनी सांभाळले होते. ‘राम तेरी गंगा मैली’ मध्ये त्यांनी साकारलेली नरेन ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली होती.  गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात राजीव कपूर यांची बहीण रितू नंदा यांचे निधन झाले होते व भाऊ ऋषी कपूर यांचे कर्करोगाने एप्रिल-२०२० मध्ये निधन झाले होते. राजीव यांच्या अचानक निधनाने चित्रपटसृष्टीत हळहळ व शोक व्यक्त होत आहे.

राजीव कपूर यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओम शांती. 

अभिनेत्री करिष्मा कपूरने गेल्या ख्रिसमस दरम्यान सेलिब्रेशनचा संपूर्ण कुटुंबाचा एकत्र फोटो शेअर केला होता. दुर्दैवाने हाच फोटो त्यांचा शेवटचा फॅमिली फोटो ठरला. 

Actor Rajiv Kapoor's last family photo during christmas celebration

 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.