– ७ फेब्रुवारीला रंगणार पं. भीमसेन जोशी स्मृती समारोह
गौड सारस्वत ब्राम्हण (जीएसबी) सभा मुलुंड या संस्थेनं मुंबई फोरम ऑफ आर्टिस्टच्या सहकार्यानं ७ फेब्रुवारीला पं. भीमसेन जोशी स्मृती समारोह आयोजित केला आहे. पं. राजा काळे यांना पं. भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार २०२१ या महोत्सवात प्रदान करण्यात येणार असून, त्यांच्यासह संगीत क्षेत्रातील मान्यवर कलाकारांचा या महोत्सवात सहभाग आहे.
जीएसबी सभा मुलुंड या संस्थेतर्फे मुंबई फोरम ऑफ आर्टिस्ट यांच्या सहकार्याने दरवर्षी हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. २०२१-२२ हे स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने या महोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदाच्या महोत्सवात ज्येष्ठ गायक पं. राजा काळे, गिटारवादक अभिषेक प्रभू, तबलावादक मंदार पुराणिक, विघ्नेश कामत, हार्मोनियमवादक अनंत जोशी, पखवाजवादक हनुमंत रावडे , मंजिरावादक अनिल पै, तानपुरा आणि गायक सहायक श्याम जोशी आणि अमृता काळे यांचा सहभाग आहे. श्रुती रानडे कार्यक्रमाचं सूत्रसंचालक करणार आहेत. ७ फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाच वाजता मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाच्या सभागृहात हा कार्यक्रम रंगणार आहे.
करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण संध्याकाळी ५. ३० ते ८.३० या वेळेत होणार असल्याने संगीतप्रेमींना घरबसल्या दर्जेदार संगीताचा आस्वाद घेता येणार असून www.gsbsabhamulund.com आणि https://www.youtube.com/ channel/UC2Kx7GQxzsmm_ 9TUV0kVc_Q या लिंकवर कार्यक्रम पाहता येईल असे संस्थेचे सरचिटणीस गणेश राव यांनी सांगितले आहे.