मध्यंतरी सलमान खान आणि  ‘झी’ यांच्यातील मोठा करार झाल्याच्या बातम्या आल्यानंतर ‘थिएटर एक्झिबिटर असोसिएशन’ने सलमान खानला त्याचा आगामी चित्रपट ‘राधे’, ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करू नये अशी विनंती केली होती. या चित्रपटाचे हक्क झी ने खरेदी केले आहेत. कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमुळे अजूनही प्रेक्षक सिनेमागृहात न परतल्याने सिनेमा हॉल्स सध्या मोठ्या संकटाचा सामना करीत आहेत. या संकटातून सलमान खानचा आगामी ‘राधे’ हा सिनेमाच बाहेर काढू शकतो याची खात्री असल्याने थिएटर एक्झिबिटर असोसिएशनने सलमानला विनंती केली होती. 

salman khan's statement about the movie Radhe

आता या विनंतीची दखल घेत सलमानने थिएटर एक्झिबिटर असोसिएशनला उत्तर देताना आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आगामी राधे हा केवळ सिनेमागृहातच प्रदर्शित होईल. सर्व सिनेमागृह ज्या कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत याची मला पूर्ण जाणीव आहे म्हणून मी हा मोठा निर्णय घेत आहे. याबदल्यात माझी सर्व सिनेमागृह चालकांना विनंती आहे की त्यांनी प्रेक्षकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी व योग्य ती सर्व खबरदारी घ्यावी. २०२१ च्या ईदला हा सिनेमा थिएटर्स मध्ये प्रदर्शित होईल. “

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.