Prerna Suryawanshi यांच्या संकल्पनेतून लवकरच येत आहे…’M’TOWN STYLE AWARDS!

साहित्य, कला, क्रिडा अशा अनेक क्षेत्रांमध्ये मराठी भाषिकांनी अवघ्या जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडले. मराठी भाषा सातासमुद्रा पार जात असतानाच प्रेरणा सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून आता एका नवीन उपक्रमाच्या दिशेने पाऊल टाकण्यात येत आहे. ते म्हणजे ‘M’TOWN STYLE AWARD- CELEBRATING FASHION’.

आजवर मराठीत कधीही न झालेल्या या उपक्रमात मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसिरीज, थिएटर, स्पोर्ट्स, मीडिया अशा विविध विभागांमधील व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. मराठी इंडस्ट्रीतही फॅशनला किती प्राधान्य आहे, तसेच मराठी इंडस्ट्रीतील फॅशन ही जगभरात पोहोचावी, या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. आजवर बॉलिवूड, हॉलिवूडमध्ये अशा प्रकारचे अनेक पुरस्कार देण्यात आले असतील. परंतु विविध क्षेत्रांमधील फॅशनला गौरवणारा मराठीमधील हा पहिला पुरस्कार असेल. २०२१ मध्ये हा सोहळा आपल्या भेटीला येणार आहे.

(Press Release)

 

Website | + posts

Leave a comment