आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Prabhas’ ‘Radhe Shyam’ will be released on March 11 in cinemas near you ‘राधे श्याम’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित अखिल भारतीय चित्रपटांपैकी एक आहे. तिसऱ्या लाटेमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले, परंतु हा चित्रपट इतका भव्य आहे की चित्रपटगृहात प्रदर्शित करणे हा एकच पर्याय होता. त्यामुळे निर्मात्यांनी 11 मार्च 2022 ही प्रदर्शनाची नवीन तारीख निवडली आहे. निर्मात्यांनी नवीन पोस्टरसह नवीन रिलीजची तारीख जाहीर केली आहे.

आतापर्यंत, आपण प्रभासची एक रहस्यमय लव्हर बॉय ‘विक्रम आदित्य’ म्हणून झलक पाहिली आहे ज्याला असाधारण म्हणता येईल आणि जे आपण भारतीय चित्रपटात कधीही पाहिले नाही. ही झलक एका अनोख्या प्रेमकथेची गाथा सांगते. ट्रेलरमध्ये आपण पाहणार आहोत की कथा कशी उलगडणार आहे आणि रहस्य कसे समोर येणार आहे.

युवी क्रिएशन्स प्रॉडक्शनचा ‘राधे श्याम’ हा चित्रपट गुलशन कुमार आणि टी-सीरिज यांनी सादर केला असून हा चित्रपट राधा कृष्ण कुमार यांनी दिग्दर्शित केला आहे आणि कोटागिरी वेंकटेश्वर राव यांनी त्याचे संपादन केले आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली असून 11 मार्च 2022 रोजी तो सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.