आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम

————————

Powerful trailer of the marathi movie ‘Sher Shivraj’ launched. महाराजांची गळाभेट, अफजलखानाचा फसलेला कपटी डाव आणि त्यानंतर महाराजांनी खानाचा बाहेर काढलेला कोथळा हे सर्व पाहून इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचा भास उपस्थितांना झाला. निमित्त होते ‘शेर शिवराज’ चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण सोहळयाचे. अफजलखानाचा कपटी डाव महाराजांनी आपल्या तल्लख बुद्धिमत्तेने त्याच्यावरच कसा उलटवला याची छोटीशी झलक उपस्थितांना रंगमंचावर प्रत्यक्ष पहायला मिळाली. बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते मुकेश ऋषी अफजलखानाची भूमिका साकारणार आहेत.

या ट्रेलर अनावरणप्रसंगी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टकातील ‘शेर शिवराज’ हे चौथे पुष्प  छत्रपतींच्या चरणी अर्पण करताना आनंद होत असल्याचे सांगितले. तसेच चित्रपटाचे निर्माते नितीन केणी, प्रद्योत पेंढरकर, अनिल नारायणराव वरखडे यांचे आभार व्यक्त केले. युएफओचे व्यवस्थापकीय संचालक श्री. कपिल अगरवाल याप्रसंगी उपस्थित होते. निर्माते प्रद्योत पेंढरकर यांनी त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.

चित्रपटाच्या संगीताविषयी संगीतकार देवदत्त बाजी, गायक अवधूत गांधी, जुईली जोगळेकर यांनी गीतरचनेच्या आठवणी सांगतानाच त्याची सुरेल झलक यावेळी सादर केली. चित्रपटाविषयीचे अनुभव आणि आपल्या भूमिकेचे नानाविध पैलू मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, मृण्मयी देशपांडे, विक्रम गायकवाड या कलाकारांनी याप्रसंगी उलगडले.

‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर उभी राहणारी ही व्यक्तिरेखा साकारण्याचं भाग्य मिळाल्याचा आनंद व्यक्त करतानाच ज्याच्या ध्यासात छत्रपती शिवाजी महाराज आहेत अशा कल्पक आणि अभ्यासू दिग्दर्शकासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळाल्याचं, अभिनेते मुकेश ऋषी यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दराऱ्यामुळेच भारताकडे वाकडया नजरेने बघण्याची कोणाचीही हिंमत झाली नसल्याचे परखड विधान त्यांनी यावेळी केले.

‘शेर शिवराज’ चित्रपटाची निर्मिती मुंबई मुवी स्डुडिओजचे नितीन केणी, राजवारसा प्रोडक्शनचे प्रद्योत पेंढरकर व अनिल नारायणराव वरखडे, तसेच मुळाक्षरचे दिग्पाल लांजेकर व चिन्मय मांडलेकर यांनी केली आहे.

mukesh rishi as afzal khan in sher shivraj movie

‘शेर शिवराज’ चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराज तर बलाढ्य अफज़लखानाच्या रुपात मुकेश ऋषी त्यांच्यासोबत मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, वर्षा उसगांवकर, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, आस्ताद काळे, वैभव मांगले, सुश्रुत मंकणी, दीप्ती केतकर, माधवी निमकर,ईशा केसकर, रिशी सक्सेना, अशी कलाकारांची तगडी फौज पहायला मिळणार आहे.

शिवचरित्रातील ही यशस्वी गाथा ‘शेर शिवराज’  चित्रपटाच्या रुपाने २२ एप्रिलला मोठया पडदयावर येणार आहे. 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment