आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम
————————
भारतातील सर्वात लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म झी5 रॉनी स्क्रूवाला यांचे आरएसवीपी आणि मँगो पीपल मीडिया, प्रतिभाशाली अभिनेत्री तापसी पन्नू अभिनीत स्पोर्ट्स ड्रामा ‘रश्मि रॉकेट’ सादर करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत. (Powerful trailer of ‘Rashmi Rocket’ Starring Taapsee Pannu unveiled!) आकर्ष खुराना यांच्याद्वारे दिग्दर्शित, बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा प्रीमियर झी5 होणार असून आपल्या अनोख्या कंटेंटसोबत एक अद्वितीय कथानक सादर करण्यासाठी तयार आहेत.
कच्छ मधील एका छोट्या गावातल्या तरुण मुलीची ही कथा आहे आणि, तिच्याकडे धावण्याची एक अविश्वसनीय अशी शक्ती आहे. आकर्ष खुराना यांच्याद्वारे दिग्दर्शित ‘रश्मी रॉकेट’, नंदा पेरियासामी यांच्या मूळ कथेवर आधारित आहे. यामध्ये ‘रश्मी रॉकेट’ला आपले स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची आणि व्यावसायिक रूपाने स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळते मात्र, तिला हेही जाणवते की फिनिश लाइन आणि धावणे यामध्ये अनेक संकटे आहेत. अखेरीस ही एथलेटिक स्पर्धा सन्मान आणि तिच्या व्यक्तिगत लढाईत रूपांतरित होते.
Trailer Link:
चित्रपटाच्या शीर्षकाला न्याय देत, ‘रश्मि रॉकेट’चे ट्रेलर नायिका आणि तिच्या रश्मी रॉकेट बनण्याच्या यात्रेची प्रेरक कहानी दाखवते. प्रभावशाली संवाद, भावना आणि तापसीचे अभिनय कौशल्य यासोबत पुरेपूर नाट्य असलेला चित्रपट आहे. बहुमुखी अभिनेत्री सिनेमाच्या सर्वच हिश्शात कणखर आणि तितकीच संवेदनशील दिसून येते ज्यामुळे चित्रपटातील ऊर्जा संतुलित राहते. तिच्यासोबत या चित्रपटात तितकेच प्रतिभाशाली सहायक कलाकार आहेत. तापसीला हातांमध्ये भारताचा झेंडा धरलेला पाहणे हा एक अविस्मरणीय क्षण आहे, जो निश्चितपणे आपल्याला रोमांचित करतो. हा ट्रेलर आपल्या प्रतीक्षा सार्थकी लावतो.
चित्रपटाचे दिग्दर्शक आकर्ष खुराना म्हणतात की, “जेव्हा प्रांजल आणि तापसी माझ्याकडे नंदा यांच्या या कथेची कल्पना घेऊन आले, तेव्हा मी चकित झालो कारण हा एक असा चित्रपट आहे ज्यामध्ये खूप काही आहे, ही एक अनिवार्यपणे मानवीय भावनेच्या विजयाबद्दल आहे. ती भावनात्मक आणि मनोरंजक असून देखील काही गंभीर मुद्द्यांना स्पर्श करण्याची संधी दिली. मी हा चित्रपट करण्यासाठी थांबूच शकत नव्हतो आणि आता तो लोकांसमोर आणण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीये.”