आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Poster of Amazon Original Movie ‘Gehraiyaan’ starring Deepika Padukone has been released on her birthday. अमेझॉन प्राइम व्हिडियोतर्फे आज ‘गहराइयां’ या आगामी अमेझॉन ओरिजिनल मूव्हीची 6 नवी पोस्टर प्रकाशित करण्यात आली. शकुन बत्रा या अत्यंत गुणी दिग्दर्शकाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटात आधुनिक नात्यांमध्ये असलेली गुंतागुंत, प्रौढत्व, एखादी गोष्ट सोडून देणे आणि स्वतःच्या आयुष्याची दिशा ठरविणे या पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री दीपिका पदुकोण हीच्या वाढदिवसाच्या दिवशी या चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित करण्यात आले. 

या प्रसंगी प्रमुख व्यक्तिरेखा दर्शविणारे पोस्टर, दीपिका व सिद्धांत यांचे हृदयस्पर्शी पोस्टर आणि प्रमुख कलाकारांची मांदियाळी असलेले पोस्टर प्रकाशित करण्यात आले. चित्रपटाविषयी उत्कंठा आणि उत्सुकता वाढविणाऱ्या या पोस्टरमध्ये या भावनानाट्यात काय पाहायला मिळू शकते, याची एक झलक दिसते.

ही पोस्टर दीपिका पदुकोणने सर्वप्रथम शेअऱ केली आणि तिने ही पोस्टर तिच्या चाहत्यांना समर्पित केली. “तुम्ही माझ्यावर केलेल्या प्रेमासाठी या खास दिवशी ही खास भेट आहे.”

दीपिका पदुकोणसोबत या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच धैर्य कारवा, नसीरुद्दीन शहा आणि रजत कपूर महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत. धर्मा प्रोडक्शन्स, व्हायकॉम 18 आणि शकुन बत्राची जोउस्का फिल्म्स यांची सहनिर्मिती असलेला हा चित्रपट फक्त अमेझॉन प्राइम व्हिडियोवर 11 फेब्रुवारी 2022 रोजी जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म्स संबंधित अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.