आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

मुंबई: लोकप्रिय मराठी अभिनेते प्रदीप पटर्वधन (Popular Marathi actor Pradeep Patwardhan passed away) यांचे आज मंगळवार दि ९ ऑगस्ट रोजी त्यांच्या गिरगाव येथील निवासस्थानी निधन झाले आहे. चित्रपट, रंगभूमी आणि दूरदर्शन या सर्वच क्षेत्रात अभिनयाचा ठसा उमटवणारे प्रदीप पटवर्धन यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.

अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे ‘मोरूची मावशी’ या नाटकातील काम आजही रसिकांच्या स्मरणात आहे. या नाटकातील ‘भैया पाटील’ ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष आवडीची होती. ‘मोरूची मावशी’ या नाटकाचे त्यांनी दोन हजारहून अधिक प्रयोग केले होते. अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करून प्रदीप पटवर्धन यांनी  रंगभूमी गाजवली आहे. ‘‘चश्मे बहाद्दर’, ‘1234’, ‘नवरा माझा भवरा’, ‘डोम’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘जमलं हो जमलं’, ‘एक शोध’ ‘नवरा माझा नवसाचा’,  जमलं हो जमलं या सिनेमातील त्यांच्या रंजक भूमिकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.

कॉलेज काळापासूनच एकांकिका स्पर्धेत त्यांनी काम केले. पुढे ते व्यावसायिक नाटकाकडे गेले. मराठी रंगभूमीवरील प्रतिभावान कलाकार म्हणून त्यांना ओळखले जाते. केवळ विनोदी भूमिकाच नाहीतर गंभीर स्वरुपाच्या भूमिका देखील त्यांनी तितक्याच प्रभावीपणे साकारल्या होत्या. त्यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. गिरगावात राहणाऱ्या प्रदीप हे गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वापासून अलिप्त होते. त्यामागील कारण त्यांचे प्रकृती अस्वास्थ्य असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. नव्वदच्या दशकात प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर यांनी अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांच्याबरोबर एकत्रित अनेक मराठी चित्रपटातून काम केले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करत ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. “मराठी रंगभूमीवरील मोरूची मावशी, बायको असून शेजारी, लग्नाची बेडी तसेच मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सदाबहार अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावले आहे.” असे एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

मराठी अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली. “प्रदीप पटवर्धन, भावपूर्ण श्रद्धांजली”, असे ट्वीट रेणुका शहाणे यांनी केले आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment