आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते अनुपम श्याम यांचे वयाच्या 63 व्या वर्षी निधन झाले. (Popular actor Anupam Shyam passed away) ते दीर्घकाळापासून किडनीशी संबंधित आजाराशी झुंज देत होते. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते व शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्यामुळे अखेरीस त्यांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी अनुपम श्याम त्यांच्या खालावलेल्या प्रकृतीचे वृत्त आल्यानंतर बॉलिवूड आणि मनोरंजन विश्वाशी संबंधित लोकांनी त्यांना मदत केली होती. 

चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. त्यांनी लिहिले की चित्रपट आणि टीव्ही उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार, अनुपम श्याम स्टार भारतचा शो प्रतिज्ञेच्या दुसऱ्या सीझनचे शूटिंग करत होते. पण ते आधीच अनेक आजारांनी ग्रस्त होते. ते मुंबईतील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. रात्री ८ च्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला. अनुपम श्याम यांनी दस्तक, हजार चौरासी की मां, दुश्मन, सत्या, दिल से, जख्म, संघर्ष, लगान, नायक, शक्ति, पाप, जिज्ञासा, राज, वेलडन, अब्बा, वॉन्टेड, कजरारे आणि … मुन्ना मायकेल सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. 

त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्येही अभिनय केला होता.  त्यांचा सर्वात लोकप्रिय टीव्ही शो प्रतिज्ञा मध्ये ते ठाकूर सज्जन सिंगच्या भूमिकेत गाजले होते. त्यांच्या भूमिकेचा लोकांवर इतका परिणाम झाला की लोक त्यांची  कॉपी करू लागले. लहान मुलेही त्यांच्या सारख्या मिशा लावून ऐटीत बोलतांना दिसायची. अनेक मोठ्या चित्रपटात काम केलेल्या या दिग्गज अभिनेत्याचे आयुष्य खूप दुःखात गेले. आजारी पडल्यानंतरही, अनुपम श्याम त्यांच्या कामाशी शेवटच्या काळापर्यंत निगडित राहिले आणि त्यांनी अभिनय सुरूच ठेवला. 

अनुपम श्याम यांचा जन्म 20 सप्टेंबर 1957 रोजी उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण प्रतापगढमध्येच झाले. त्यांनी लखनौच्या भारतेन्दू नाट्य अकादमीमधून रंगभूमीचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी दिल्लीतील श्री राम सेंटर थिएटरमध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. अनुपम श्याम यांना चित्रपटांमध्ये बहुतेक नकारात्मक भूमिका मिळाल्या. त्यांनी काही आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्येही काम केले. त्यापैकी ‘द लिटल बुद्ध’ आणि ऑस्कर विजेता ‘स्लमडॉग मिलियनेअर’ चित्रपट विशेष आहेत. या चित्रपटात अनुपमने एक पात्र साकारले जे मुलांना भीक मागण्यासाठी आंधळे करायचे. शेखर कपूरच्या बॅंडिट क्वीन या चित्रपटाचाही ते  महत्त्वाचा भाग होते. याशिवाय त्यांनी द वॉरियर आणि थ्रेड या चित्रपटांमध्येही काम केले. हिंदी चित्रपटांमध्ये शक्ति, हल्ला बोल और रक्तचरित, परजानिया, दास कैपिटल, पान सिंह तोमर, हजार चौरासी की मां, दुश्मन, सत्या, दिल से, जख्म, कच्चे धागे, तक्षक, बवंडर, नायक, कसूर, लगान आणि लज्जा या चित्रपटातील त्यांच्या भूमिका चर्चेत राहिल्या. 

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment