आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

आज ज्येष्ठ गायिका व संगीतकार खय्याम यांच्या पत्नी जगजीत कौर यांचे निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. (Playback singer Jagjit Kaur widow of Khayyam dies at 91) जगजीत कौर यांच्यावर जुहू स्मशानभूमीत कोविड -१९ प्रतिबंधांच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत  अंतिम संस्कार करण्यात आल्याचे त्यांचे प्रवक्ते  प्रीतम शर्मा यांनी सांगितले. त्यांचे पती, राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीत दिग्दर्शक खय्याम यांचे १९ ऑगस्ट २०१९ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले होते. 

जगजीत कौर यांचा जन्म चंदीगड मधील एका शीख कुटुंबात झाला होता. जगजीत कौर चित्रपटांमध्ये पार्श्वगायिका बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आल्या. खय्याम यांच्या जीवनप्रवासात त्यांच्या पत्नी जगजीत कौर यांची विशेष भूमिका राहिली.जगतीत कौर स्वत: एक उत्तम गायिका राहिलेल्या आहेत. खय्याम यांनी संगीतबद्ध केलेले शगुन चित्रपटातील प्रसिद्ध गीत – तुम अपना रंज़ो ग़म अपनी परेशानी मुझे दे दो हे जगजीत कौरने गायलेल्या अप्रतिम गाण्यांपैकी एक आहे. जगजीत कौर यांनी खय्याम यांच्या बहुतांश चित्रपटांमध्ये कमीतकमी एक गाणे गायले आहे. निवडक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी उत्तम गाणी गायली होती. ‘बाजार’मधील ‘देख लो हमको जी भरके’ किंवा ‘उमराव जान’मधील ‘काहे को बयाहे बिदेस’ही गाणी त्यांनी गायली. या दोघांना मुलगा प्रदीप होता, ज्याने १९९० मध्ये आलेल्या ‘जाने वाफा’ या चित्रपटात काम केला होते. पण प्रदीपचे लहान वयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

जगजीत कौर यांनी गायलेली काही गाणी : 

“खामोश ज़िन्दगी को अफसाना मिल गया”..दिल-ए-नादान (1953), गीत-शकील बदायुनी, संगीत-ग़ुलाम मोहम्मद

“पहले तो आँख मिलाना”, शोला और शबनम (1961) (रफ़ी के साथ) गीत-कैफ़ी आज़मी, संगीत-खय्याम

“लड़ी रे लड़ी तुझसे आंख जो लड़ी”, शोला और शबनम (1961) गीत-कैफ़ी आज़मी, संगीत-खय्याम

“देखो देखो जी गोरी ससुराल चली” शगुन (1964), गीत-साहिर लुधियानवी, संगीत-खय्याम

“तुम अपना रंज-ओ-ग़म अपनी परेशानी मुझे दे दो” शगुन (1964), गीत-साहिर लुधियानवी, संगीत-खय्याम

“नैन मिलाके, प्यार जताके, आग लगा दी” (रफी के साथ) मेरा भाई मेरा दुश्मन (1967), संगीत-खय्याम

“साडा चिड़िया दा चम्बा वे” कभी-कभी (1976), (पामेला चोपड़ा के साथ) संगीत-खय्याम

“चले आओ सैयां रंगीले मैं वारी रे” बाज़ार (1981), (पामेला चोपड़ा के साथ) गीत-जगजीत कौर, संगीत-खय्याम

“देख लो आज हमको जी भर के” बाज़ार (1981), गीत-मिर्ज़ा शौक़, संगीत-खय्याम

“काहे को ब्याही विदेस” उमराव जान (1981), संगीत-खय्याम

जगजीत कौर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा  

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.