अमेझॉन प्राइम व्हिडिओकडून पहिलीच मराठी डायरेक्ट‌-टू-सर्विस ऑफरिंग ‘पिकासो’च्‍या वर्ल्‍ड प्रिमिअरची घोषणा

प्‍लॅटून वन फिल्‍म्‍स अॅण्‍ड एव्‍हरेस्‍ट एंटरटेन्‍मेंटच्‍या बॅनरअंतर्गत शिलादित्‍य बोराद्वारे निर्मित ‘पिकासो’चे दिग्‍दर्शन व लेखन अभिजीत मोहन वारंग यांनी केले असून राष्‍ट्रीय पुरस्‍कार-विजेते अभिनेते प्रसाद ओक, तसेच समय संजीव तांबे आणि अश्विनी मुकादम प्रमुख भूमिकेत आहेत

अमेझॉन प्राइम व्हिडिओने आज त्‍यांची पहिली मराठी डायरेक्‍ट-टू-सर्विस ऑफरिंग ‘पिकासो’चा ट्रेलर सादर केला. पुरस्‍कार-विजेते अभिनेते प्रसाद ओक (Prasad Oak), बालकलाकार समय संजीव तांबे (Samay Sanjeev Tambe) आणि अश्विनी मुकदाम (AshwiniMukadam) अभिनीत ‘पिकासो’ अस्‍वस्‍थ मद्यपी वडिल व त्‍याच्‍या मुलाच्‍या संबंधित उत्तम कथेच्‍या माध्‍यमातून दशावतार कलेची झलक दाखवते. शिलादित्‍य बोराद्वारे (Shiladitya Bora) निर्मित ‘पिकासो’चे दिग्‍दर्शन व सह-लेखन पदार्पणीय अभिजीत मोहन वारंग (Abhijeet Mohan Warang), तसेच सह-लेखक तुषार परांजपे (Tushar Paranjape) यांनी केले आहे. भारत आणि २४० देश व प्रदेशांमधील प्राइम सदस्‍य १९ मार्च २०२१ पासून फक्‍त अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर मराठी नाट्य ‘पिकासो’चा विशेष वर्ल्‍ड प्रिमिअर पाहू शकतात.

चित्रपटाच्‍या कथानकाबाबत बोलताना पदार्पणीय दिग्‍दर्शक व सह-लेखक अभिजीत मोहन वारंग म्‍हणाले, ”मला बालपणापासूनच दशावतार कलेने आकर्षून घेतले आहे. मला दशावताराला अस्‍सल व मूळ स्‍वरूपात दाखवणारा पहिला चित्रपट ‘पिकासो’ सादर करण्‍याचा आनंद होत आहे. मी प्रत्‍येक कलाकारासाठी हा चित्रपट सहभावना दर्शवण्‍याचा निर्धार केला. म्‍हणूनच आम्‍ही वास्‍तविक ठिकाणी चित्रपटाचे शूटिंग केले. लोककथेनुसार लोककलेचा उगम तळकोकणाच्‍या वालावल शहरामधील लक्ष्‍मी-नारायण मंदिरामधून झाला आहे, जेथे आम्‍ही चित्रपटाचे शूटिंग केले आहे. या चित्रपटासह आम्‍ही कलाकाराच्‍या जीवनातील दैनंदिन आव्‍हानांना समोर आणण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. सर्जनशीलतेची असमर्पक, वेदनादायी, पण समाधानकारक प्रक्रिया म्‍हणजे स्‍वत:लाच प्रश्‍न विचारत समस्‍यांचा सामना करण्‍याच्‍या नवीन पद्धतींचा शोध घेणे.”

प्‍लॅटून वन फिल्‍म्‍सचे निर्माता शिलादित्‍य बोरा म्‍हणाले, ”मराठी चित्रपटसृष्‍टी ही भारतातील सर्वात प्रगतीशील चित्रपटसृष्‍टी असून हिने अलिकडील दशकामध्‍ये काही उल्‍लेखनीय चित्रपटांची निर्मिती केली आहे, याबाबत काहीच शंका नाही. यापैकी अनेक चित्रपटांची आंतरराष्‍ट्रीय समीक्षकांनी प्रशंसा केली आहे आणि भारतातील बॉक्‍स ऑफिस विक्रम मोडून काढले आहेत. ‘पिकासो’ हा असाच एक चित्रपट आहे, जो सर्व वयोगतील व सीमांपलीकडील प्रेक्षकांना प्रेरित करेल. प्‍लॅटून वन फिल्‍म्‍समधील आमच्‍या संपूर्ण टीमला अॅमेझॉन प्राइम व्हिडिओसोबत सहयोग करण्‍याचा आणि आमच्‍या स्‍वत:च्‍या लहानशा प्रयत्‍नामध्‍ये या वैविध्‍यपूर्ण कथाकथनाध्‍ये अशा कथांचे योगदान देण्‍याचा आनंद होत आहे. मी भारत आणि २४० देश व प्रदेशांमधील स्ट्रिमिंग सर्विसवर या चित्रपटाचे वर्ल्‍ड प्रिमिअर सादर होताना पाहण्‍यास खूपच उत्‍सुक आहे.”

 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.