आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

On the occasion of Release of ‘Pawankhind’ Movie, Warriors of Maratha Empire are going to reach the children in the form of attractive toys.  ‘स्पायडरमॅन’, ‘बॅटमॅन’, ‘सुपरमॅन’, ‘अॅव्हेंजर्स’ अशा विविध हॅालिवूडपटांमधील सुपरहिरोजनी जगभरातील रसिकांना केवळ भुरळच घातली नाही, तर हे सुपरहिरोज खेळण्यांच्या माध्यमातून थेट रसिकांच्या घरापर्यंत पोहोचले आहेत. लहान मुलांच्या भावविश्वात या सुपरहिरोजने खूप महत्त्वाचं स्थान निर्माण केलं आहे, पण आपल्या इतिहासात दडलेले सुपरहिरोज आजवर कधीही अशा स्वरूपात घरोघरी पोहोचलेले नाहीत. प्राणांची बाजी लावून पराक्रम गाजवत इतिहासाच्या पानांमध्ये अजरामर झालेले खरे सुपरहिरो महाराष्ट्राच्या लाल मातीत होऊन गेले आहेत. हे सुपरहिरो खेळणी रूपाने मुलांच्या भावविश्वात आणि त्या अनुषंगाने घरोघरी पोहाचवण्याचे अनोखे आणि अत्यंत प्रेरणादायी काम पावनखिंड’ या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून आलमंड्स क्रिएशन्स तर्फे करण्यात येत आहे.

हॅालिवूडपटांमधले सुपरहिरोज काल्पनिक आहेत मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात अजरामर झालेले मावळे हे खरे आहेत. हे शूरवीर मावळेच खरे सुपरहिरो होते आणि आहेत. आजच्या काळात या सर्व खऱ्याखुऱ्या सुपरहिरोजची माहिती भावी पिढीपर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे. पावनखिंड’ या सिनेमाच्या निमित्तानं अशा प्रकारचा पहिला प्रयत्न करण्यात आला आहे, जो मराठी सिनेसृष्टीसोबतच शिवप्रेमी रसिकांसाठीसुद्धा खऱ्या अर्थानं अभिमानास्पद आहे.

‘पावनखिंड’ या चित्रपटात प्राणपणाने लढणारे बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे, रायाजीराव बांदल, श्रीमंत कोयाजीराव बांदल यांच्यासह बांदल सेनेतील काही निवडक शूरवीर मावळे आकर्षक खेळण्यांच्या रूपात लहान मुलांपर्यंत पोहोचणार आहेत. लहान मुलांचा खेळही व्हावा आणि त्यांना शिवकालीन इतिहासाची माहितीही मिळावी असा दुहेरी हेतू यामागे आहे. पुढच्या पिढीपर्यंत आपला इतिहास पोहोचवण्याचं काम त्यामुळं सोपं होणार आहे. खेळता-खेळता त्यांच्या मनावर इतिहासाची माहिती कोरली जाईल.

Pawankhind Marathi Movie Toys

मोल्डींगची ही खेळणी अत्याधुनिक प्लॅस्टीक फॅारमॅटमध्ये आहेत. मजबूत, आकर्षक आणि टिकाऊ असलेली ही खेळणी आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध करण्यात आली आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील दुकानांसह सर्व मॅाल्समध्ये ही खेळणी पोहोचणार आहेत. ‘पावनखिंड’ प्रदर्शित होण्यापूर्वी ही बच्चे कंपनींपर्यंत पोहोचतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. खेळाचे नियम व अटी खेळण्यांसोबतच देण्यात आले आहेत. मराठी सिनेमाच्या विस्तारणाऱ्या कक्षेसोबत त्याच्या मार्केटिंग आणि प्रसिद्धीच्या संकल्पनाही कमालीच्या विस्तारत आहेत. ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या निमित्ताने अजय आणि अनिरुद्ध आरेकर या निर्मात्यांनी केलेला हा अनोखा प्रयत्न प्रादेशिक चित्रपटांमध्ये आणि त्यातही मराठीत प्रथमच होताना दिसत आहे.

ए.ए.फिल्म्स प्रस्तुत आणि आलमंड्स क्रिएशन्स निर्मित ‘पावनखिंड’ ची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर आणि भाऊसाहेब आरेकर यांची असून दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचं लेखन–दिग्दर्शन केलं आहे.

‘पावनखिंड’ १८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.