‘सुपर ३०’ आणि ‘८३’ मध्ये एकत्र काम केल्यानंतर निर्माता साजिद नाडियाडवाला व आपल्या चोखंदळ भूमिकांसाठी ओळखले जाणारे अभिनेते पंकज त्रिपाठी आता तिसऱ्यांदा ‘बच्चन पांडे’ या आगामी सिनेमा साठी पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. 

या निमित्ताने अभिनेता अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी हे प्रथमच एकत्र काम करणार आहेत. सिनेमाशी संबंधीत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार “क्रिती सॅनॉन आणि पंकजने यापूर्वी लुका छुपी मध्ये सोबत काम केले आहे मात्र पंकज आणि अक्षय पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. दोघेही त्यांच्या कॉमिक टाइमिंग आणि चोखंदळ भूमिकांच्या निवडीसाठी सुपरिचित आहेत.  जानेवारीपासून जैसलमेर येथे सुरु होणाऱ्या शूटिंगमध्ये मध्ये पंकज त्रिपाठी हे अक्षय, क्रिती, जॅकलिन आणि अरशद वारसी यांना जॉईन होतील. 

bachchan pandey movie starcast

अक्षय या चित्रपटात एका गँगस्टरची भूमिका साकारत आहे, तर क्रिती पत्रकाराच्या भूमिकेत आहे. दोघांनाही सिनेमाची प्रचंड आवड असते आणि मग कथानकात त्यामुळेच ट्विस्ट येते. बच्चन पांडे २०२१ मध्ये रिलीज होणार आहे.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.