आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

पॅन इंडिया स्टारचा बिग कॅनव्हास, रोमँटिक ड्रामा ‘राधे श्याम’ पुढील वर्षी मकर संक्रांतीला देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या उत्सुकतेत आणखी भर टाकत, बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या पोस्टरने जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर आज नव्या नेत्रदीपक अशा पोस्टरचे अनावरण केले. (Pan-India Magnum Opus Radheshyam, Starring Prabhas and Pooja Hegde, unveiled a new poster on the occasion of Janmashtami!) यामध्ये प्रभास एका सुंदर टक्सिडोमध्ये आणि पूजा हेगडेने एक चित्ताकर्षक बॉल गाऊन घातलेला दिसतो आहे, पोस्टर थेट एका परीकथेतून अवतरल्यासारखे भासत असून चित्रपटाने चाहत्यांसाठी साठवून ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची झलक यात आहे.

राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित, ही एक बहुभाषिक प्रेमकथा 1970 मध्ये युरोपमध्ये घडते आहे. इटली, जॉर्जिया आणि हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणावर चित्रीत झालेला, अत्याधुनिक व्हिज्युअल इफेक्ट्सने सज्ज राधे श्याम एका मेगा कॅनव्हासवर अवतरत असून, यामध्ये प्रभास आणि पूजा यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अनोख्या रूपामध्ये दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार म्हणाले की, “या चित्रपटावर आम्ही खूप मेहनत घेतली आहे आणि आम्ही प्रेक्षकांना एक भव्य नाट्यानुभव देण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. राधे श्याम 14 जानेवारी 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत असून जन्माष्टमीच्या या विशेष दिवशी चित्रपटाचे पोस्टर सादर करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत.”

राधेश्याम हा बहुभाषिक चित्रपट असून गुलशन कुमार आणि टी-सीरिज यांची प्रस्तुती आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. यूव्ही क्रिएशन्सने तयार केलेल्या या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.