आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

चित्रपट क्षेत्रात कार्यरत चित्रसाधकांचे एकत्रिकरण आणि भारतीय विचारांचे मुल्यसंवर्धन या उद्देशाने काम करीत असलेल्या देवगिरी चित्र साधनेतर्फे संहिता लेखन (Script Writing) या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि. ३१ जुलै व १ ऑगस्ट २०२१ रोजी करण्यात आले आहे.  चित्रपट क्षेत्रात यशस्वी लेखक म्हणून कारकीर्द असलेले सुप्रसिद्ध लेखक श्री. दिलीप शुक्ला, मुंबई या दोन दिवसीय कार्यशाळेत पूर्ण वेळ मार्गदर्शन करणार आहेत. (Online Script Writing Workshop of well known writer Dilip Shukla arranged by Deogiri Chitra Sadhana)

कार्यशाळा पूर्णपणे नि:शुल्क आहे तरी इच्छुकांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन देवगिरी चित्र साधनातर्फे करण्यात आले आहे. दामिनी, घातक, अंदाज अपना अपना, दबंग, दबंग 2, दबंग 3 अशा एकाहून एक गाजलेल्या चित्रपटांचे लेखक दिलीप शुक्ला यांचे मार्गदर्शन या कार्यशाळेत लाभणार आहे. सदर कार्यशाळा निःशुल्क असली तरी कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे.

नोंदणीसाठी गूगल फॉर्म ची लिंकhttps://forms.gle/QJii6yTixauqTGmY8 

भारतीय चित्र साधनाचे राष्ट्रीय महामंत्री श्री.राकेश मित्तल , उज्जैन हे उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करतील. सुप्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक श्री.दिग्पाल लांजेकर , पुणे (फर्जंद , फत्तेशिकस्त इ. गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक) हे समारोप सत्रात चित्र रसिकांशी संवाद साधतील. चित्रपटाची संहिता (स्क्रिप्ट)कशी लिहावी..? कथा कशी सांगावी..? ह्या पुर्ण गोष्टींचे मार्गदर्शन कार्यशाळेत मिळणार आहे. ही कार्यशाळा ऑनलाईन पद्धतीने Zoom App वर आयोजित केलेली असून, अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क : ९७६६२०१६७६,९९७५२७७७५५.

हेही वाचा – इटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.