आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

On the occasion of International Women’s Day, the poster of upcoming Marathi film ‘Ananya’ launched. ‘अनन्या’ म्हणजे वेगळेपण. इतरांपेक्षा वेगळी. अशीच एक दिलखुलास ‘अनन्या’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे’, अशी सकारात्मक टॅगलाईन असलेल्या ‘अनन्या’ या चित्रपटाचे पोस्टर आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खास प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप कड यांनी केले आहे. तर ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांनी निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. नावाला सार्थ असणारी ‘अनन्या’ १० जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

On the occasion of International Women's Day, the poster of upcoming Marathi film 'Ananya' launched

आपल्या भूमिकेविषयी हृता दुर्गुळे म्हणते, ” आयुष्य खूप सुंदर आहे. ते मनमुराद जगावे. खूप उर्जा आणि सकारात्मकता देणारा हा चित्रपट आहे.’’ तर चित्रपटाचे निर्माता रवी जाधव म्हणतात, ”आज महिला दिनाच्या निमित्ताने हे पोस्टर आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. या निमित्ताने आम्ही सर्व महिलांचा सन्मान करत आहोत. जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगायला हवा. महिलांसाठी काहीही अशक्य नाही. फक्त त्यांची इच्छाशक्ती प्रबळ हवी.” निर्माता संजय छाब्रिया म्हणतात, ”जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन खूप मह्त्वाचा आहे. ‘अनन्या’मधून आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे. अनन्याची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.”

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.