‘चलो बुलावा आला है’ किंवा ‘ओ जंगल राजा मेरी मैया को लेके आजा’ अशा भजनांनी रसिक श्रोत्यांच्या हृदयावर राज्य करणारे भजन सम्राट नरेंद्र चंचल  यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. नरेंद्र चंचल बऱ्याच काळापासून आजारी होते. गेले तीन दिवस त्यांच्यावर दिल्लीतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी १२.१५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक प्रसिद्ध भजनांसह हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी गाणी गायली आहेत.

नरेंद्र चंचल यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूड आणि त्यांचे चाहते शोकात आहेत. नरेंद्र चंचल, यांनी उत्तर भारतातील भक्ती संगीत व विशेष करून ज्याला ‘माता का जगराता’ म्हटले जाते या संगीताला वेगळी दिशा दिली. शास्त्रीय संगीतासोबतच त्यांनी लोकसंगीतानेही  लोकांची मने जिंकली.

narendra chanchal dead

नरेंद्र चंचल यांनी आई कैलाशवतीला लहानपणापासूनच माताराणीचे भजन गातांना ऐकले होते. . आईचे भजन ऐकून त्यांनाही संगीताची आवड निर्माण झाली. नरेंद्र चंचल यांचे पहिले गुरु त्यांची आई होती, त्यानंतर, चंचल यांनी प्रेम त्रिखा यांच्याकडून संगीत शिकले. त्यानंतर त्यांनी भजन गाणे सुरू केले. 

बॉलिवूडमधील त्यांचा प्रवास राज कपूरपासून सुरू झाला. ‘बॉबी’ चित्रपटात त्यांनी ‘बेशक मंदिर मस्जिद तोड़ो’ गायले होते. यानंतर त्यांनी बर्‍याच चित्रपटांत गाणी गायली, परंतु ‘आशा’ चित्रपटातील भक्तीगीत ‘चलो बुलावा आया है’ मधून त्यांना ओळख मिळाली. 

अलीकडेच नरेंद्र चंचल यांनी कोरोनाबद्दल एक गाणे गायले होते, जे जोरदार व्हायरल झाले होते. त्यांची वैष्णोदेवीवर खूप श्रद्धा होती. १९४४ पासून माता वैष्णो देवीच्या दरबारात आयोजित वार्षिक जागरणात ते हजेरी लावत असत पण यावेळी कोरोनाकमुळे ते शक्य झाले नव्हते. 

नरेंद्र चंचल यांना नवरंग रुपेरी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. 

Website | + posts

Leave a comment