आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

“Naad Naad Ganapati” in the voice of Divya Kumar! “चोरीचा मामला”, “भेटली ती पुन्हा” तसेच आगामी “लव सुलभ” अशा उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर स्वरूप स्टुडिओज् आता स्वरूप म्युझिक या नव्याकोऱ्या युट्युब म्युझिक चॅनलद्वारे म्युझिक अल्बम क्षेत्रात पदार्पण करत आहेत. गणेशोत्सवाचे औचित्य साधत “नाद नाद गणपती….” या गाण्यानं म्युझिक चॅनलचा शुभारंभ होत असून, ‘जी करदा’सारखी अनेक हिट गाणी गायलेला विख्यात गायक दिव्या कुमारनं हे गाणं गायलं आहे.

स्वरूप म्युझिकच्या प्रभाकर परब, सचिन नारकर, विकास पवार यांनी “नाद नाद गणपती…” या गाण्याची निर्मिती केली आहे. विष्णु सकपाळ यांनी लिहिलेलं हे गाणं वरद-राजू या संगीतकार जोडीनं संगीतबद्ध केलं आहे. गाण्याचं संगीत संयोजन आणि प्रोग्रामिंग मॉन्टू गोसावी, राजू कुलकर्णी, वरद कुलकर्णी यांनी केले असून संगीत संयोजक रूपम भागवत आहेत.

दिव्या कुमार हे चित्रपट संगीतातलं मोठं नाव आहे. हिंदी मराठी चित्रपटांसह त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही अनेक हिट गाणी गायली आहेत. तर स्वरूप स्टुडिओजनं आतापर्यंत उत्तम चित्रपट निर्मिती केली आहे. त्यामुळे स्वरूप स्टुडिओजनं आता नव्या दमाच्या कलाकारांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी “स्वरूप म्युझिक” हा स्वतंत्र चॅनल सुरू केला आहे.

divya kumar singer in marathi music album ganapati song

“नाद नाद गणपती हा दमदार म्युझिक व्हिडिओच्या रुपानं २४ ऑगस्टला प्रेक्षकांसमोर येत आहे. दिव्या कुमार यांनी काही मराठी चित्रपटांसाठी गाणी गायली असली, तरी “नाद नाद गणपती…” हा त्यांचा पहिलाच मराठी म्युझिक अल्बम आहे. त्यामुळे त्यांच्या जादुई आवाजासह उत्तम शब्द आणि संगीत असलेला हा म्युझिक व्हिडिओ यंदाच्या गणेशोत्सवाचं आकर्षण ठरेल हे नक्की.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment