आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Mushtaq Merchant, the famous comedian of Bollywood films, passed away on Monday, 27 December in Mumbai. बॉलीवूड चित्रपटातील प्रसिद्ध विनोदी अभिनेता मुश्ताक मर्चंट यांचे सोमवार, २७ डिसेंबर रोजी मुंबईत निधन झाले. मुश्ताक हे दीर्घकाळापासून मधुमेहाशी झुंज देत होते.

अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेले प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेते मुश्ताक मर्चंट यांचे सोमवारी २७ डिसेंबर रोजी मुंबईतील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ६७ वर्षीय मुश्ताक मर्चंट दीर्घकाळापासून मधुमेहाशी झुंज देत होते. मुश्ताकच्या कुटुंबीयांनी त्याच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मुश्ताक यांनी ‘हाथ की सफाई’, ‘सीता और गीता’, ‘जवानी दीवानी’, ‘सागर’, ‘प्यार का साया’ आणि ‘फिफ्टी फिफ्टी’ यांसारख्या अनेक प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले होते. मुश्ताक यांनी बॉलीवूडचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘शोले’ मध्येही काम केले होते पण चित्रपटाच्या लांबीमुळे त्यांची भूमिका कमी करण्यात आली होती.

मुश्ताक यांनी १६ वर्षांपूर्वी मधुमेहामुळे अभिनय सोडला होता. यानंतर मुश्ताक सुफी बनले आणि केवळ धार्मिक कार्यात गुंतले. मुश्ताक यांच्या पार्थिवावर धार्मिक विधी नुसार अंतिम संस्कार  करण्यात येणार आहेत.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.