आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Motion poster launch of “1770” based on the literary work ‘Anandmath’ by ‘Bankimchandra’ भारताचा गौरवशाली ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करताना, निर्माते शैलेंद्र केकुमार, सुजय कुट्टी, कृष्ण कुमार बी आणि सूरज शर्मा यांनी बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या बंगाली कादंबरीवर आधारित बहुचर्चित भव्यदिव्य अशा ‘१७७० ‘चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. एकाचवेळी हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगाली अशा सहा भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

एस एस १ एन्टरटेनमेन्ट आणि पी के एंटरटेनमेंट या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत असून या बहुभाषिक असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक अश्विन गंगाराजू हे करणार आहेत. त्यांनी याआधी राजामौली यांना ‘एग्गा ‘ आणि ‘बाहुबली ‘ या दोन्ही चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.

1770 movie poster

अश्विन गंगाराजू म्हणतात ,” हा विषय माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होता ,पण दिग्गज व्ही विजयेंद्र प्रसाद यांनी रूपांतरित कथा आणि पटकथा लिहिल्याने मला निश्चित वाटते आहे की आमच्याकडे ज्या पद्धतीने हे लेखन झाले आहे ,तो एक ब्लॉकबस्टर सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. ते पुढे म्हणाले ,” ज्या कथांमध्ये विशिष्ट कालखंड दाखवणारी पार्श्वभूमी असेल ,भावनांना जिथे जास्त महत्व असेल ,आणि जिथे ‘लार्जर than लाईफ कृतीला वाव असेल ,अशा कथांकडे एक निर्माता म्हणून मी जास्त आकर्षित होतो . या गोष्टीबद्दल सुरुवातीला मी थोडा साशंक होतो ,पण जेव्हा मी राम कमल मुखर्जी यांच्याशी बोललो ,आणि त्यांचा या बद्दलचा दृष्टिकोन जाणून घेतला ,तेव्हा माझा आत्मविश्वास वाढला. “त्यानंतर काही वेळातच मी निर्माते शैलेंद्र जी, सुजय कुट्टी सर, कृष्ण कुमार सर आणि सूरज शर्मा यांना मुंबईत भेटलो.आमची चित्रपटाबद्दल आणि त्यांना तो चित्रपट कशा पद्धतीने पुढे न्यायचा आहे याविषयी प्रदीर्घ चर्चा झाली. एकत्र काम करण्याची त्यांची वृत्ती , त्यांच्या मनातील जिव्हाळा या गोष्टींमुळे मी त्यांच्याशी लगेचच जोडला गेलो ,” अश्विन सांगत होते.

Ashwin Gangaraju, trained by director SS Rajamouli, will direct "1770".
दिग्दर्शक अश्विन गंगाराजू

यावर्षी “वंदे मातरम”ची १५० वर्षे पूर्ण होत आहेत, हे गीत महर्षी बंकिमचंद्र यांच्या “आनंदमठ” कादंबरीत प्रथम आले होते आणि या गीताने ब्रिटिश साम्राज्याच्या मुळांना हादरवून टाकले होते पटकथा लिहिणारे भारतातील सर्वात प्रसिद्ध कथाकार व्ही विजयेंद्र प्रसाद म्हणतात, “वन्दे मातरम्” हा एक जादुई शब्द होता असे मला वाटते. महर्षी बंकिमचंद्र यांनी राष्ट्राला जुलूम आणि अन्यायाविरुद्द लढण्याकरिता दिलेला हा एक मंत्र होता . स्वातंत्र्य चळवळीची आग पेटवणाऱ्या अनेक अज्ञात योद्धयांची कहाणी आम्ही “१७७०” मध्ये हाताळत आहोत.

दिवाळीपर्यंत या चित्रपटातील कलाकारांची घोषणा होणार असून अश्विनने त्याच्या टीमसह या कालखंडावर संशोधन सुरू केले आहे आणि एक अद्वितीय असा चित्रपट तयार करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.