आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Marathi Vruttapatra Lekhak Sangh’s State Level Award for Best Diwali Magazine goes to ‘Navrang Ruperi-2021’ मुंबई- मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, आयोजित ४६ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला ज्यात चित्रपट या विषयावरील ‘नवरंग रुपेरी-२०२१’ या दिवाळी अंकाला ‘उत्कृष्ट दिवाळी अंक ‘ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

मुंबईत झालेल्या एका शानदार सोहळ्यात नुकताच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘नवरंग रुपेरी’ च्या वतीने अंकाचे निवासी संपादक व ज्येष्ठ सिनेअभ्यासक धनंजय कुलकर्णी आणि अंकाच्या मुंबई प्रतिनिधी आणि जेष्ठ सिनेपत्रकार पूजा सामंत यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नागपूर तरुण भारतचे संपादक गजानन निमदेव, महाराष्ट्र राज्य मराठी भाषा अभ्यास केंद्र प्रमुख प्रा. डॉ. दीपक पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर वृत्तपत्र लेखक संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे तसेच शिवसेना आरोग्य कक्ष प्रमुख महेश चिवटे आदी मान्यवर उपस्थित होते.

Navrang Ruperi Diwali Magazine 2021 Marathi Vruttapatra Lekhak Sangh's State Level Award

हिंदी/मराठी चित्रपट, रंगभूमी, टेलिव्हिजन, ओटीटी अशा करमणूक जगताच्या विविध माध्यमांना समर्पित व १९८७ सालापासून प्रकाशित होणाऱ्या या अंकाचे हे ३५ वे वर्ष होय. यापूर्वीही नवरंग रुपेरी ला उत्कृष्ट दिवाळी अंकाचे ४० हुन अधिक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

अंकाचे संस्थापक संपादक व ज्येष्ठ सिनेसमीक्षक अशोक उजळंबकर यांनी या पुरस्काराचे श्रेय अंकाचे महाराष्ट्रभरात असलेले असंख्य वाचक, लेखक, निर्मितीत योगदान देणारे टाईप सेटर्स, मुद्रक तसेच नवरंग रुपेरी परिवाराचे हितचिंतक व अखेरीस आर्थिक दृष्ट्या अंकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेल्या जाहिरातदारांना दिले आहे. “भविष्यात यापुढेही वाचनीय, माहितीपूर्ण व साहित्यिक मूल्ये असलेला असा दर्जेदार अंक देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असेल” अशी भावना अंकाचे कार्यकारी संपादक अजिंक्य उजळंबकर यांनी व्यक्त केली.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.