आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Marathi Movie ‘Bhirkit’ to release on June 17. Poster launched On the occasion of Gudi Padva. सध्या अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘भिरकीट’ या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर झळकले होते , त्यात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी आणि तानाजी गालगुंडे एकाच स्कुटरवर दिसले होते.  अखेर १७ जून रोजी ‘भिरकीट’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या संदर्भात दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणाले की, आजच्या काळात पैसा, प्रसिद्धी एकंदरच भौतिक सुखाचे भिरकीट प्रत्येकाच्या मागे हात धुवून लागले आहे. यात एक अशी व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहे, जी स्वतःच ‘भिरकीट’ आहे. त्या व्यक्तीच्या आयुष्यात अशी घटना घडते आणि तो त्यात कसा अडकला जातो, हे ‘भिरकीट’मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, मोनालिसा बागल, कुशल बद्रिके, सागर कारंडे, सैराट फेम तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद या कलावंतांनी विनोदाची बहार उडवून दिली आहे.”

Marathi Movie 'Bhirkit' to release on June 17. Poster launched On the occasion of Gudi Padva

क्लासिक एंटरप्राइज प्रस्तुत सुरेश जामतराज ओसवाल आणि भाग्यवंती ओसवाल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कथा अनुप जगदाळे तर पटकथा संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत ,कॅमेरा मीर आणि संकलन फैजल महाडिक यांचे आहेत. शैल-प्रितेश या हिंदी जोडीचे संगीत लाभले आहे , युफओने या चित्रपटाची धुरा सांभाळली आहे. 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.