आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

फिल्म फाऊंडेशन व वेल्फेअर फाऊंडेशन औरंगाबाद यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या “रिल्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा”त प्रकाश जाधव दिग्दर्शित “वेल डन बॉईज” या चित्रपटाची निवड झाली आहे. (Marathi Film “Well Done Boys” selected for the Reels International Film Festival)

एकूण  ४३४ सिनेमांमधून या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. लहान मुले ही देशाची भविष्य असतात.  प्रत्येक शाळेत जसे हुशार विद्यार्थी असतात तसेच खोडकर, उनाड व मस्तीखोर विद्यार्थीही असतात. परंतु या मुलांमध्येही कुठेतरी चांगले गुण दडलेले असतात. या मस्तीखोर मुलांचे अंधकारमय भविष्य शिक्षकांमार्फत कसे प्रकाशमय करता येईल असा एक प्रयत्न या चित्रपटातून केलेला आहे. चित्रपटातील आशिष निनगुरकर व अशोक मानकर लिखित गाण्यांना  श्रीरंग आरस व एस.पी. सेन यांनी संगीत दिले असून पल्लवी केळकर, श्यामल सावके, गीता व जे. पी दत्ता यांनी ही गाणी गायली आहेत.

Actors Mohan Joshi and Vijay Patkar during the shooting of 'Well done Boys'
‘वेलडन बॉईज’ चित्रपटाच्या चित्रीकरणप्रसंगी अभिनेते मोहन जोशी व विजय पाटकर

‘वेलडन बॉईज’ या चित्रपटाचे लेखन अशोक बाफना व किशोर ठाकूर यांचे असून अशोक मानकर व महेंद्र पाटील यांनी संवाद लिहिले आहेत. गीतलेखन आशिष निनगुरकर व अशोक मानकर यांनी केले असून  चित्रपटाचे छायांकन त्रिलोकी चौधरी, हितेश बेलडर व प्रकाश कारलेकर यांचे असून संकलन- दिग्दर्शन प्रकाश  आत्माराम जाधव यांचे आहे. या चित्रपटात मोहन जोशी, विजय पाटकर, शिल्पा प्रभूलकर, प्रिय रंजन, विनोद जॉली, महेंद्र पाटील व आशिष निनगुरकर यांच्याबरोबर अनेक बालकलाकारांनी यात भूमिका साकारली आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment