आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Marathi Film Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha releasing in theaters on 14th January समाजातील वास्तववादी घटनांचे दर्शन घडवण्यात अग्रेसर असणाऱ्या निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर पुन्हा एकदा आपल्या आगामी चित्रपटाद्वारे सत्य परिस्थिती मांडण्यासाठी सज्ज झाले आहेत. उत्सुकता वाढवणाऱ्या टायटलला कुतूहल जागवणाऱ्या मोशन पोस्टरची जोड दिल्यानंतर आता ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ चं नवं पोस्टर आणि ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आले असून पुढील शुक्रवारी १४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha Film Poster

नुकतंच रिलीज करण्यात आलेलं ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाचं नवं पोस्टर चित्रपटातील विविध व्यक्तिरेखांचं दर्शन घडवणारं आहे. ‘काँक्रिटच्या जंगलातील उद्ध्वस्त अस्तित्व’ ही पोस्टरवरील टॅगलाईन दाहकतेची जाणीव करून देणारी आहे. या चित्रपटातील काळ जवळपास तीन दशकांपूर्वीचा आहे. त्या काळी झालेल्या गिरणी कामगारांच्या संपाचा, संपकरी आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवनावर झालेला भीषण परिणाम, त्यांची विदारक परिस्थिती, त्यांनी सहन केलेल्या वेदना, संपामुळं पूर्णत: वाताहत झालेली पिढी आणि त्याचे समाजात उमटलेले पडसाद ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ मध्ये पहायला मिळणार आहेत. ‘अठरा वर्षांवरील प्रेक्षकहो, दम असेल तरच थेटरात येऊन बघायचं…’ ही पोस्टरवरील ओळही लक्ष वेधून घेते. प्रेम धर्माधिकारी, वरद नागवेकर, छाया कदम, शशांक शेंडे, रोहित हळदीकर, कश्मिरा शाह, उमेश जगताप, गणेश यादव, अतुल काळे, अश्विनी कुलकर्णी, सविता मालपेकर, ईशा दिवेकर आदी कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.

ज्येष्ठ लेखक जयंत पवार यांच्या धारदार लेखनशैलीद्वारे कथेमध्ये निर्माण झालेल्या हृदयभेदी नाट्यानं मांजरेकरांना आकर्षित केलं होतं. त्यातून ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाची निर्मीती झाली.

अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांची निर्मिती तसेच वितरण करणाऱ्या ‘एन एच स्टुडिओज’ या भारतातल्या अग्रगण्य निर्मिती संस्थेने या मराठी चित्रपटाच्या प्रस्तुतीची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘एन एच स्टुडिओज’ मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहेत. या चित्रपटाची निर्मिती नरेंद्र हिरावत व श्रेयांस हिरावत यांनी केली असून सहनिर्मिती ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’च्या विजय शिंदे यांनी केली आहे. ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ ला हितेश मोडक यांनी संगीत व पार्श्वसंगीत दिलं आहे. या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करण बी. रावत यांनी केली आहे.

‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ चित्रपट १४ जानेवारीला राज्यभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.