आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Marathi Film Coffee Starring Siddharth Chandekar, Kashyap Parulekar and Spruha Joshi releasing on 14th January. जिच्या केवळ सुगंधानंच मन प्रफुल्लीत होतं, शरीराला आलेला थकवाही परागंदा होतो ती म्हणजे कॅाफी… पूर्वीपेक्षा आजच्या जनरेशनमध्ये कॅाफी वेगवेगळ्या कारणांमुळं पॅाप्युलर आहे. १४ जानेवारीला रसिकांना चित्रपटगृहांमध्ये ‘कॅाफी’चा स्वाद चाखायला मिळणार आहे. गोड चेहऱ्याची आणि कवी मनाची अभिनेत्री अशी ओळख असणारी स्पृहा जोशी रसिकांसाठी लज्जतदार ‘कॅाफी’घेऊन आली आहे. तिच्या जोडीला आहेत सिद्धार्थ चांदेकर आणि कश्यप परुळेकर.

‘तन्वी फिल्म्स’ची प्रस्तुती असलेल्या ‘कॅाफी’ची निर्मिती कैलास सोरारी आणि विमला सोरारी यांनी केली असून या चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केलं आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना अनोखी प्रेमकथा पहायला मिळणार आहे. प्रेम आणि कॅाफीचा सुखद संगम या चित्रपटाच्या निमित्तानं घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  या चित्रपटात उत्साही, हरहुन्नरी आणि नेहमी प्रसन्न असणारा सिद्धार्थ दिसेल. कश्यपनं साकारलेल्या कॅरेक्टरचा स्वभाव मात्र काहीसा गंभीर आणि समजूतदार असल्याचं पहायला मिळेल. या दोघांना सांभाळून घेणारी लव्हेबल स्पृहा या चित्रपटाचं मुख्य आकर्षण ठरणार आहे.

कथा-पटकथा मच्छिंद्र बुगडे यांनी लिहीली असून, मच्छिंद्र यांनीच नितीन यांच्या साथीनं संवादलेखनही केलं आहे. नितीन यांनी अशोक बागवे यांच्यासोबत या चित्रपटासाठी गीतलेखनही केलं असून, त्यांना तृप्ती चव्हाण यांनी संगीतसाज चढवला आहे. आय. गिरीधरन यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे, तर संकलन राहुल भातणकर यांचं आहे. हरिश आईर यांनी कलादिग्दर्शनाची, तर संजय कांबळे यांनी कार्यकारी निर्मात्यांची जबाबदारी  बजावली आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.