आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

मराठी चित्रपटसृष्टीतील नृत्यकलाकारांसाठी आयोजित ‘मराठी क्रिकेट लीग’ नुकतीच दिमाखात संपन्न झाली. स्वातंत्र्यदिनी ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडलेल्या या लीग मध्ये नृत्यदिग्दर्शक आणि नृत्यकलाकारांच्या १३ संघांचा समावेश होता. ‘शेलार मामा फॉउंडेशन’ च्या सहकार्याने रंगलेल्या या स्पर्धेत नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे यांचा संघ विजयी ठरला तर नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर यांचा संघ उपविजेता ठरला. (Marathi Cricket League for Dance Artists from Marathi Film industry Concluded recently)

कोविड काळानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या लीगसाठी निर्माती श्रेया योगेश कदम यांची उपस्थिती सर्व कलाकारांना मार्गदर्शक राहिली. अभिनेता सुशांत शेलार यांचे मोलाचे सहकार्य या स्पर्धेला लाभले. या कठीण काळात या सर्व नर्तकांना मदतीचा हात मिळावा यासाठीसुद्धा शेलार मामा फॉउंडेशनने पुढाकार घेतला. गरजू नृत्यकलाकारांसाठी रेशन कीट उपलब्ध करून देण्यात आले.

Marathi Cricket League for Dance Artists from Marathi Film industry Concluded recently

केवळ कोरोना काळापुरती ही मदत नसून ‘मराठी क्रिकेट लीग कमिटी’ नृत्यकलाकारांना नेहमीच सहकार्य करीत राहील. तसेच त्यांच्या चांगल्या वाईट प्रसंगात सदैव त्यांच्या पाठीशी उभी राहील, अशी खात्री अभिनेता सुशांत शेलार यांनी दिली. 

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा  

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.