बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी यांचे पती निर्माता, दिग्दर्शक राज कौशल यांचे निधन झाले आहे. राज कौशल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. (Mandira Bedi’s husband, Producer, Director and Writer Raj Kaushal passes away) 

फिल्ममेकर ओनिर यांनी सोशल मीडियावरील बातमीला दुजोरा दिला आणि लिहिले, “Gone too soon. We lost Film maker and Producer @rajkaushal1 this morning. Very Sad. He was one of the producers of my first film #MyBrotherNikhil. One of those few who believed in our vision and supported us. Prayers for his soul.”

राज कौशल हे एक लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता होते जे २२ वर्षांहून अधिक काळापासून हिंदी  चित्रपट आणि अनेक जाहिरातींची निर्मिती करीत होते. बॅचलर ऑफ सायन्स पदवीधर राज कौशल यांनी १९८९ मध्ये कॉन्ट्रॅक्ट अ‍ॅडव्हर्टायझिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत  तीन वर्षांसाठी कॉपीरायटर म्हणून करिअरची सुरुवात केली. १९९२ ते १९९६ या काळात राज यांनी दिग्दर्शक स्व. मुकुल आनंद यांच्या नेतृत्वात एमएडी फिल्म्स मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. १९९८ मध्ये राज कौशल यांनी आपली जाहिरात निर्मिती कंपनी – फ्युएल ची स्थापना केली.  तेव्हापासून त्यांनी भारतातील बहुतेक आघाडीच्या जाहिरात एजन्सी आणि ब्रॅण्डसाठी ८०० पेक्षा जास्त जाहिरातींचे दिग्दर्शन केले होते.  

Mandira Bedi with Husband Raj Kaushal
Mandira Bedi with Husband Raj Kaushal

१९९९ मध्ये राज कौशल यांनी त्यांचा पहिला हिंदी चित्रपट ‘प्यार में कभी कभी’ दिग्दर्शित केला. २००४ मध्ये राज कौशलने दिग्दर्शित केलेला दुसरा चित्रपट होता ‘शादी का लड्डू’  ज्यात आशिष चौधरी, संजय सूरी, मंदिरा बेदी आणि समिता बंगारगी यांची प्रमुख भूमिका होती. २००६  मध्ये ‘अँथनी कौन हैं’ हा संजय दत्त आणि अरशद वारसी अभिनीत त्यांचा तिसरा  चित्रपट होता. राज कौशल यांनी ‘माय ब्रदर … निखिल’, ‘रुबुरू’ आणि ‘मीराबाई नॉट आउट’ या चित्रपटांची  निर्मितीदेखील केली आहे.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.