आज ‘लूप लपेटा’ या आगामी सिनेमातील तापसी पन्नूचा ‘फर्स्ट लूक’ बाहेर आला आहे, ज्यात तापसी बरीच रंजक अशा अंदाजात दिसत आहे. तापसीचा हा खास लूक बाहेर येताच त्याबद्दल चर्चा सुरु झाली असून तापसीचे फॅन्स या लुक्सची तारीफ करताना दिसत आहेत. सध्या यशाच्या शिखरावर असलेली तापसी ‘लूप लपेटा’ या आगामी कॉमेडी-थ्रिलर चित्रपटाद्वारे लवकरच रसिकांना भेटणार आहे. 

‘लूप लपेटा’ हा चित्रपट १९९८ साली बनलेल्या सुपरहिट व एव्हरग्रीन जर्मन चित्रपट  ‘रन लोला रन’ चा हिंदी रिमेक आहे, ज्याचे दिग्दर्शन टॉम टायकवर यांनी केले होते. आकाश भाटिया दिग्दर्शित, सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडिया, एलिसिप एंटरटेनमेंट (तनुज गर्ग, अतुल कसबेकर) आणि आयुष माहेश्वरी निर्मित लूप लपेटा या चित्रपटामध्ये तापसी पहिल्यांदा पडद्यावर तापसी अभिनेता ताहिर राज भसीन सोबत दिसणार आहेत. गोव्यात चित्रपटाचे शूटिंग अंतिम टप्प्यात आहे.

Website | + posts

Leave a comment