आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Lata Mangeshkar’s condition critical, shifted on ventilator भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा चिंताजनक झाली आहे. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. त्यांना ८ जानेवारी रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकर या ९२ वर्षांच्या आहेत आणि त्यांना वयाशी संबंधित इतर समस्याही आहेत. दरम्यान, त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी देशभरातून प्रार्थना  प्रार्थना केल्या जात आहेत.

लता मंगेशकर डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत
लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत असलेले डॉ. प्रतित समदानी यांनी एएनआयला सांगितले की, लताजींची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. डॉक्टरांचे पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. 

काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यांचा कोरोना अहवालही निगेटिव्ह आला आहे. ताज्या माहितीनुसार, लता मंगेशकर अजूनही आयसीयू वॉर्डमध्ये आहेत, व डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे. यापूर्वी, लता मंगेशकर यांना २०१९ मध्ये श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

सात दशकांची कारकीर्द
आपल्या सात दशकांच्या कारकिर्दीत, लता मंगेशकर यांनी अनेक भारतीय भाषांमध्ये 30,000 गाणी गायली आहेत. लता मंगेशकर यांना सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्कार भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कारासह डझनभर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.