आज अभिनेता कार्तिक आर्यन ने आपल्या आगामी सिनेमा ‘धमाका’ मधील भूमिकेचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. या चित्रपटात कार्तिक हा ‘अर्जुन पाठक’ ही व्यक्तिरेखा साकारत असून त्याचा पहिला ‘इंटेन्स लूक’ आज त्याने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून रिलीज केला आहे.

राम माधवानी या चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक आहेत. रॉनी स्क्रूवाला हे सुद्धा चित्रपटाचे सह-निर्माते आहेत. कार्तिकने काही दिवसांपूर्वी त्याच्या वाढदिवशी या चित्रपटाची घोषणा करतांना त्याचे फर्स्ट लूक पोस्टर प्रकाशित केले आहे. या सिनेमाचे शूटिंग नुकतेच सुरु झाले असून २०२१ साली हा चित्रपट प्रदर्शित होईल. धमाका हा साऊथ कोरियन चित्रपट ‘दि टेरर लाईव्ह’ चा हा रिमेक असल्याचे कळते. 

Website | + posts

Leave a comment