आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Kartik Aaryan announces his upcoming film ‘Shehzada’! कार्तिक आर्यन सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या टाइटल्सची अशातऱ्हेने घोषणा करत आहे जशी पुस्तकाची पाने पलटत असावा. रोहित धवन यांच्याद्वारे दिग्दर्शित त्याचा आगामी चित्रपट ‘शहजादा’ची घोषणा हा या वर्षीचा त्याच्या तिसरा चित्रपट आहे, ज्यावर तो काम करतो आहे.

या चित्रपटात तो आपली ‘लुका छुपी’ची सह-कलाकार कृति सेननसोबत दिसणार असून अभिनेता अल्लू अर्जुनच्या पावलावर पाऊल टाकायला सज्ज आहे. ज्याने ओरिजनल चित्रपट ‘अला वैकुंठपुरमुलु’मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. 2020 मधली सर्वात मोठ्या हिट चित्रपटाला हिंदी दर्शकांसाठी पुन्हा बनवण्यात येत आहे. कार्तिकने या आधी अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुंठपुरमुलु’मधील गाणे ‘बुट्टा बोम्मा’वर एक डांस व्हिडीओ शेअर केला होता आणि आता, ‘शहजादा’च्या घोषणेने चाहत्यांचा उत्साह वाढवला आहे.

कार्तिक आर्यनने आपल्या सोशल मीडियावर याची घोषणा करताना लिहिले,”#Shehzada 👑
Duniya ka Sabse Gareeb Prince ❤️
@kritisanon #RohitDhawan”

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

चित्रपटात मनीषा कोइराला आणि परेश रावल हे देखील सहायक भूमिकेत असणार आहेत. आपले टाइटल, टैग लाइन, कार्तिक आर्यन यांच्यामुळे हा रीमेक दमदार होणार आहे. लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता असून 4 नोव्हेंबर, 2022 पडद्यावर येईल.

कार्तिक आर्यनकडे महत्त्वाच्या चित्रपटांची रांग असून चित्रपटांच्या बॅक टू बॅक घोषणांमुळे ही यादी वाढतच चालली आहे. सध्या त्याच्याकडे ‘धमाका’, ‘भूल भुलैया 2’, ‘फ्रेडी’ आणि ‘शहजादा’ आदी चित्रपट आहेत.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.