आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Kalayatri Award was presented to famous Hindi and Marathi actor Sachin Khedekar at Shahu Smarak Bhavan in Kolhapur. ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या नावे मिळालेला कलायात्री पुरस्कार हा माझ्या कलेचा सन्मान आहे’ असे अभिनेते सचिन खेडेकर यांनी सांगितले. निमित्त होते नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त दिल्या जाणाऱ्या १२ व्या कलायात्री पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे. कलायात्री पुरस्कार हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांना मंगळवारी कोल्हापुरात शाहू स्मारक भवन येथे प्रदान करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमात दानवे परिवारातर्फे त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. खेडेकर म्हणाले, कलेची आवड होती, पण त्यात करिअर करण्याची संधी मिळेल असे वाटले नव्हते पण प्रेक्षकांना माझा अभिनय आवडत गेला अन आपसूकच कला क्षेत्राशी घनिष्ठ नाते निर्माण झाले. यावेळी प्रा. डॉ. सुजय पाटील यांच्या प्रकट मुलाखतीतून सचिन खेडेकर यांनी आपल्या चित्रपट क्षेत्राचा जीवनप्रवास उलगडला. राजदर्शन दानवे यांच्या हस्ते खेडेकर यांना पुरस्कार देणेत आला. यावेळी जयश्री दानवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

अनुपमा चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. जाई भागवत यांनी सन्मानपत्राचे वाचन केले आणि राजदर्शन दानवे यांनी आभार मानले. यावेळी कोल्हापुरातील असंख्य मान्यवर उपस्थित होते. 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.