आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

India’s first aerial action film ‘Fighter’ will release on 25 January 2024. भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, व्हायकॉम18 स्टुडिओ आणि मारफ्लिक्स पिक्चर्स द्वारे निर्मित आगामी अ‍ॅक्शन पॅक चित्रपट ‘फायटर’ २५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण भारतीय वायुसेनेचे पराक्रमी पायलट सकरणार असून, अनिल कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

भारतातील सर्वात मोठे अ‍ॅक्शनपट बनवण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद, ‘फायटर’च्या निमित्ताने पाहाल्यांदाच निर्मात्याच्या खुर्चीत बसत आहेत. या चित्रपटाला भव्य व आकर्षक बनवण्यासाठी निर्मात्यांनी कंबर कसली असून, प्रेक्षकांना सेल्युलॉइडवर कधीही न पाहिलेला अनुभव देण्यासाठी निर्माते सज्ज झाले आहेत. भारताच्या सशस्त्र दलांना मानवंदना देणारा हा चित्रपट, प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणे एक सुवर्णयोग आहे.

‘फायटर’ हा भारतातील पहिला एरियल अ‍ॅक्शन चित्रपट असून, या चित्रपटाच्या निमित्ताने हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. निर्माता आणि व्हायकॉम18 स्टुडिओचे सीओओ अजित अंधारे यांचा भारतीय मूळ असलेला आंतरराष्ट्रीय दर्जाचा अ‍ॅक्शन चित्रपट निर्माण करून जागतिक प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण जगभर झाले असून, चित्रपटाच्या निर्मितीमध्ये अत्याधुनिक तंत्रे आणि तंत्रज्ञानाचा सुरेख वापर करण्यात आला आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.