आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

The 22nd edition of the International Indian Film Academy (IIFA) Awards is all set to be held on Yas Island, Abu Dhabi, on March 18th and 19th, 2022. आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी (IIFA) पुरस्कारांची 22 वी आवृत्ती अबू धाबीच्या यास बेटावर, 18 आणि 19 मार्च 2022 रोजी, अबू धाबीच्या संस्कृती आणि पर्यटन विभागाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे.
IIFA 2022 will be Hosted by Bollywood superstar Salman Khan. (Image Courtesy-PR)

भारत आणि अबू धाबी यांच्यात अनेक दशकांपासून संस्कृती आणि व्यापाराच्या माध्यमातून उत्कृष्ट संबंध आहेत. IIFA पुरस्कारांच्या या 22 व्या आवृत्तीत भारतीय चित्रपटसृष्टीच्या उत्कृष्ट प्रतिभेचा भव्य उत्सव साजरा केला जाणार असून सोबतच iifa जगभरातील मान्यवर, आंतरराष्ट्रीय मीडिया, चाहते आणि चित्रपट रसिकांना एकत्र आणणार आहे. या कार्यक्रमाचा होस्ट बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान असणार आहे व हा कार्यक्रम मध्यपूर्वेतील सर्वात मोठ्या अत्याधुनिक इनडोअर मनोरंजन स्थळ, इतिहाद अरेना, अबू धाबी येथील यास बे वॉटरफ्रंट येथे होणार आहे.

या प्रसंगी बोलताना सलमान खान म्हणाला, “मला आयफा फॅमिलीचा एक भाग असण्याचा आणि काही उत्तम स्थळांना प्रवास करण्याचा नेहमीच आनंद वाटतो, पण या वर्षी मला खूप आनंद होत आहे की आम्ही माझ्या वैयक्तिक आवडत्या यास आयलंड, अबू धाबीला जात आहोत. . IIFA हा नेहमीच संस्मरणीय काळ असतो आणि भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष आणि UAE चा 50 वा वर्धापन दिन-सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना हा वर्ष आणखी मोठा उत्सव असेल. गेल्या 21 वर्षांमध्ये, IIFA ने भारतीय सिनेमाला केवळ एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठच दिले नाही, तर आम्हाला आमच्या चाहत्यांपर्यंत नेण्याची आणि जागतिक स्तरावर लाखो लोकांना जोडण्याची एक उत्तम संधी निर्माण केली आहे. 2022 च्या आयफा वीकेंड आणि अवॉर्ड्स यास आयलंड, अबू धाबी येथे यजमानपदासाठी सज्ज झाल्याचा मला अभिमान आणि आनंद वाटतो कारण आम्ही सिनेमा आणि उत्सवाच्या माध्यमातून जगाला एकत्र करतो.”

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.