आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Heart touching trailer of Amazon original movie ‘Sharmaji Namkeen’ starring Rishi Kapoor and Paresh Rawal released! प्राइम व्हिडिओने आज आगामी अमेझॉन ओरिजिनल चित्रपट शर्माजी नमकीनच्या ट्रेलरचे अनावरण केले. ह्या कौटुंबिक मनोरंजन करणा-या चित्रपटात दिवंगत ऋषी कपूर आणि परेश रावल यांच्यासह जुही चावला, सुहेल नय्यर, तारुक रैना, सतीश कौशिक, शीबा चड्ढा आणि ईशा तलवार अशी तगडी कलाकारांची फौज आहे. शर्माजी नमकीन हा हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिलाच असा चित्रपट आहे ज्यात दोन ऋषी कपूर आणि परेश रावल ह्या दोन दिग्गज अभिनेत्यांनी एकच पात्र वठवले आहे.

प्रेम आणि मनोरंजनाने परिपूर्ण अशा ट्रेलरमध्ये आत्म-साक्षात्कार आणि एका निवृत्त विधुराचा स्वतःचा शोध घेण्याच्या प्रवासाच्या हृदयस्पर्शी कथेची झलक दाखवतो. स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी आणि एकाकीपणापासून दूर राहण्यासाठी तो यादृच्छिक कामे करतो. ब-याच धडपडीनंतर शेवटी महिलांच्या किटी गटात सामील झाल्यानंतर त्याच्या स्वयंपाक करण्याच्या आवडीच्या रूपाने त्याच्या आयुष्यात परत आनंद येतो.

हितेश भाटिया दिग्दर्शित आणि रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली आणि मॅकगफिन पिक्चर्सचे हनी त्रेहान, अभिषेक चौबे यांच्या सहयोगाने निर्मित, भारतासह इतर २४० देशातील प्राइम सदस्य ३१ मार्चपासून शर्माजी नमकीन या प्रदर्शित होणा-या चित्रपटाच्या विशेष प्रीमियरचा लाभ घेऊ शकतात.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.