आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

“Hawahawai” marathi film hits the screens on October 7. “द ग्रेट इंडियन किचन” या बहुचर्चित मल्याळम सिनेमातील अभिनेत्री निमिषा संजयनचं मराठीत पदार्पण होणारा चित्रपट म्हणून ‘हवाहवाई’ची जोरदार चर्चा आहे. निमिषासह वर्षा उसगावकर, सिद्धार्थ जाधव, समीर चौघुले अशा दमदार कलाकारांची फौज या चित्रपटात असून, “हवाहवाई” हा चित्रपट ७ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर मुंबईतील फूड स्टॉल चालविणाऱ्या महिलांच्या हस्ते शिवाजी पार्क येथे लाँच करण्यात आले.

मराठी तारका प्रॉडक्शन्सचे महेश टिळेकर आणि नाईनटिन नाईन प्रॉडक्शन्सचे विजय शिंदे यांनी “हवाहवाई” चित्रपटाची निर्मिती केली आहे. महेश टिळेकर यांनी चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन केलं आहे. महेश टिळेकर यांनी आतापर्यंत अनेक उत्तमोत्तम कौटुंबिक चित्रपट केले असल्याने “हवाहवाई” त्याच मांदियाळीतला आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या ८८व्या वर्षी या चित्रपटातलं उडत्या चालीचं एक गाणं हवाहवाईमध्ये गायलं आहे. गायिका उर्मिला धनगर हिच्या ठसकेबाज आवाजातही एक उत्तम गीत रेकॉर्ड करण्यात आले आहे. चित्रपटाचे संगीत पंकज पडघन यांचे असून चित्रपटातील गीते महेश टिळेकर यांनी लिहिली आहेत. कला दिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे. कार्यकारी निर्माता म्हणून अभिजित अभिनकर यांनी काम पाहिले असून नृत्य दिग्दर्शन सॅन्डी संदेश यांचे आहे.

hawahawai marathi film poster launch

मल्याळम चित्रपटांमध्ये निमिषा संजयननं सशक्त अभिनेत्री म्हणून ओळख मिळवली आहे. आता हवाहवाई या चित्रपटाद्वारे ती मराठी चित्रपटांत दाखल होत आहे. तिच्यासह अभिनेत्री वर्षा उसगावकर महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. संजीवनी जाधव, किशोरी गोडबोले, समीर चौघुले, अतुल तोडणकर, सिद्धार्थ जाधव, गौरव मोरे, मोहन जोशी, स्मिता जयकर, गार्गी फुले, प्राजक्ता हनमघर, पूजा नायक, सीमा घोगळे, बिपिन सुर्वे, अंकित मोहन या कलाकारांनी विविध भूमिका हवाहवाई चित्रपटात साकारल्या आहेत. अतिशय फ्रेश लुक असलेल्या पोस्टर आणि मातब्बर कलाकार यामुळे आता “हवाहवाई” चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनांची नक्कीच पर्वणी ठरेल यात शंका नाही. 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.