अवघ्या जगावर कोरोनाचे सावट असून आज प्रत्येक जण आपापल्या परीने कोरोनायोद्धांना, गरजुंना मदत करत आहेत. अशीच कौतुकास्पद कामगिरी पोलादपूर तालुक्याचे सुपुत्र आणि लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘हरिओम’ (HariOm) चित्रपटाचे निर्माता, अभिनेता हरिओम घाडगे आणि त्यांच्या टीमने केली.

कोरोनापासून बचाव करण्याकरता पोलादपूर पोलीस स्टेशन व सरकारी दवाखान्यातील सर्व कर्मचारी, माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिक जगताप, महाड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी महाड नगरपरिषद लोक विकास सामाजिक संस्था आणि महाड प्रेस असोसिएशनने सुरु केलेल्या कोव्हीड सेंटरसाठी तसेच कोरोनाच्या काळात फ्रंटलाईनवर काम करणारे पत्रकार, आमदार भरतशेठ गोगावले यांनी बिरवाडी एमआयडीसी येथे उभारलेल्या कोविड सेंटर, पितळवाडी येथील सरकारी आरोग्य केंद्र, रायगड पाचाड आरोग्य केंद्र, वरंडोली ग्रामस्थांना स्टीमरचे विनामूल्य वाटप केले. तसेच आजूबाजूच्या आदिवासी पाड्यातील गरजुंना अन्नधान्यांचे वाटप केले. (hariom marathi movie team donates steamer and food to covid front line workers)

hariom marathi movie team donates steamer and food to covid front line workers

या वेळी पोलादपूर तालुक्याचे उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, किरण जेधे, बाबू पारटे, परमेश्वर तांगडे, पोलादपूर पोलीस कर्मचारी व आरोग्य कर्मचारी, सचिन पवार, दिनेश मोरे, राम शिंदे, श्रद्धा जगताप, गोपीचंद घाटगे, पंकज पटेल आदी उपस्थित होते.

या नाविन्यपूर्ण उपक्रमाबरोबरच आपण समाजाचे काही देणे लागतो, या विचारातूनच हरिओम घाडगे यांनी मुंबईच्या सिंह नरवीर तानाजी प्रतिष्ठानच्या माध्यमामधून मोठ्या प्रमाणात समाजसेवेचा वसा हाती घेतला आहे.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.