आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

‘Funral’ Marathi Movie is coming to theaters on June 10. ‘माणूस जेव्हा जन्माला येतो, तेव्हा तो रडत येतो आणि सारं जग आनंदी होतं. पण जेव्हा तो जातो, तेव्हा तो शांत होतो आणि सारं जग रडतं. हीच जगरहाटी आहे. थोडक्यात काय तर… ‘जगू आनंदे आणि निघू आनंदे! हा संदेश लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘फनरल’ हा मराठी चित्रपट येत्या १० जूनला प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालाय.

निर्माते व लेखक रमेश दिघे व दिग्दर्शक विवेक दुबे या जोडीने सिनेसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना एक छान सामाजिक कथा फनरल चित्रपटाच्या स्वरूपात मांडली व त्याच चित्रपटाचं आज कौतुक होताना दिसतंय.

आरोह वेलणकर, संभाजी भगत, प्रेमा साखरदांडे, विजय केंकरे यांसारखे दर्जेदार कलाकार या चित्रपटात आहेत. काही ठिकाणी हसवत आणि काही ठिकाणी भावनिक करत हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो अशा प्रतिक्रिया फेस्टिवलमध्ये हा चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांनी दिल्या आहेत. ‘जगू आनंदे निघू आनंदे’ या संकल्पनेवर आधारित असल्याने ‘फनरल’च्या टीमने पवित्रस्थळी म्हणजे चक्क स्मशानभूमीत या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले.

Funral Marathi Movie is coming to theaters on June 10

‘मृत्यु हा अशुभ नसून अमूल्य आहे’, त्यामुळे प्रत्येक जाणाऱ्या व्यक्तीला त्याचा शेवटचा सन्मान ही यथायोग्य पद्धतीने मिळायला हवा या विचाराने काम करणारे ताडदेव पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल श्री.ज्ञानदेव वारे यांच्या हस्ते फनरल चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने श्री. वारेंनी आजपर्यंत चाळीस हजारांहून अधिक बेवारस मृतांचे अंतिम संस्कार केले आहेत. 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment