आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

First glimpse of Vijay Deverakonda and Ananya Panday’s much-awaited film Liger. साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा याचे जगभरात प्रचंड चाहते आहेत. साऊथमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करणारा हा अभिनेता आता बॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे. चाहत्यांचा उत्साह कायम ठेवत,  लायगर चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज चित्रपटाची एक झलक शेअर केली. या अॅक्शन-पॅक व्हिडिओमध्ये विजय देवराकोंडा आक्रमक आणि दमदार लूकमध्ये दिसत आहे. व्हिडिओ पाहून चित्रपटाचा सेट किती भव्य आहे याची कल्पना येऊ शकते.

लायगर  हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या ५ भाषांमध्ये रिलीज होणार असून, विजयसोबत अनन्या पांडेही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दिग्गज बॉक्सर माईक टायसनला पाहणे देखील रोमांचक असेल. सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये चित्रपट पाहण्याची प्रचंड उत्सुकता आहे.

धर्मा प्रॉडक्शन आणि पुरी कनेक्ट्स अंतर्गत करण जोहर, चार्मी कौर, अपूर्व मेहता आणि हिरू यश जोहर निर्मित, पुरी जगन्नाध दिग्दर्शित,  लायगर साला क्रॉसब्रीड हा चित्रपट २५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.