आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम

————————

अखेर सूर्यवंशी (Sooryavanshi) सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग आज मोकळा झाला. महाराष्ट्रातील सिनेमागृहांना २२ ऑकटोबर नंतर उघडण्याची परवानगी मिळाल्यानंतर आज सिनेमाच्या निर्मात्यांनी त्वरित सूर्यवंशी च्या दिवाळी प्रदर्शनाची तारीख घोषित केली. सोबत अक्षय कुमार याने सुद्धा आज त्याच्या ट्विटर हॅण्डल वरून आज सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेची अधिकृत घोषणा केली. सूर्यवंशी अखेर दिवाळी २०२१ मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार असल्याचे त्याने ट्विटरवर जाहीर केले. (Film Sooryavanshi Starring Akshay Kumar, Ready To Release This Diwali 2021)

तब्बल दीड वर्षापासून हा सिनेमा प्रदर्शनास सज्ज आहे परंतु  लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर  हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही. दरम्यान हा सिनेमा थेट ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित होईल अशी  मध्यंतरी निर्माण झाली होती परंतु सिनेमाशी संबंधित व्यक्तींनी आम्ही हा सिनेमा केवळ चित्रपटगृहातच प्रदर्शित करू असे जाहीर केले. रसिकांशी दिलेला शब्द पाळत आज सिनेमाच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर करण्यात आली. 

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.