सुप्रसिद्ध चित्रपट संकलक/संपादक वामन भोसले (Waman Bhonsle) यांचे आज सोमवार, दि. 26 एप्रिल रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.  १९६९ मध्ये त्यांनी राज खोसला यांच्या ‘दो रास्ते’ या चित्रपटाद्वारे आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली होती. (Famous film editor Waman Bhonsle passed away).

१९ फेब्रुवारी १९३२ रोजी गोव्यातील पोंबुर्पा या गावी त्यांचा जन्म झाला व १९५२ साली मुंबईत शालेय शिक्षण संपवून त्यांनी बॉम्बे टॉकीज येथे डी.एन.पै यांच्या हाताखाली संकलनाचे धडे घेतले. त्यानंतर १२ वर्षे त्यांनी सहाय्यक संकलक म्हणून फिल्मिस्तान स्टुडिओज मध्ये काम केले.  ‘मेरा गाव मेरा देश’, ‘इंतेकाम’, ‘इंकार’, ‘मौसम’, ‘आंधी’, ‘दोस्ती’, ‘कर्ज’, ‘हिरो’, ‘सौदागर’ आणि ‘गुलाम’ इत्यादी अशा अनेक हिंदी चित्रपटांचे संकलन त्यांनी केले होते.  ‘इन्कार’ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 

राज खोसला, सुभाष घई, गुलजार, शेखर कपूर, रवी टंडन, महेश भट्ट इत्यादी अनेक आघाडीच्या दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केले होते. सौदागर (१९९२) साठी त्यांना उकृष्ट संकलनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. शिवाय एफटीआय, पुणे, लक्स झी सिने अवॉर्ड, गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल लाईफ टाइम अवॉर्ड, मामी टेक्निकल एक्सिलन्स अवॉर्ड, बिमल रॉय ट्रॉफी, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने २०१९ चा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार अशा असंख्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 

निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांनी ट्विटर वर वामन भोसले यांनी श्रद्धांजली वाहिली .. 

Website | + posts

Leave a comment