आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

आज ऋषी कपूर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने  एक्सेल एंटरटेनमेंटने आपला अतिशय खास चित्रपट ‘शर्माजी नमकीन’च्या फर्स्ट लुकचे अनावरण केले आहे. (Excel Entertainment unveils first look of its very special film ‘Sharmaji Namkeen’)

अनावरण करतांनाची घोषणा करतांना आपल्या सोशल मीडियावरील पोस्ट मध्ये एक्सेल एंटरटेनमेंट ने लिहिले आहे की,  “आम्हाला एक अतिशय खास चित्रपट ‘शर्माजी नमकीन’च्या पोस्टरचे अनावरण करताना आनंद होतो आहे, ज्यामध्ये हिंदी चित्रपट उद्योगातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांमधील एक श्रीमान ऋषि कपूर आहेत, ज्यांचे शानदार चित्रपट आणि अद्वितीय काम आपल्या सर्वांसाठीच एक अमूल्य ठेवा आहे. त्यांच्याविषयीचे प्रेम, सन्मान आणि आठवणींच्या रूपात त्यांच्या लाखो चाहत्यांसाठी भेट म्हणून त्यांच्या अंतिम चित्रपटाच्या ‘फर्स्ट लुक’चे अनावरण करत आहोत. श्री परेश रावल यांचे खूप खूप आभार, ज्यांनी ऋषि-जी यांच्याद्वारे साकारण्यात येणाऱ्या व्यक्तिरेखेला चित्रित करण्यासाठी संवेदनशील पाऊले उचलत या चित्रपटाला पूर्ण केले. एक्सेल एंटरटेनमेंट आणि मैकगफिन पिक्चर्सद्वारे निर्मित, नवोदित हितेश भाटियाद्वारे दिग्दर्शित, हा चित्रपट एका प्रेमळ 60 वर्षीय व्यक्तिची कथा आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Excel Entertainment (@excelmovies)

एक्सेल एंटरटेनमेंटद्वारे प्रस्तुत आणि मैकगफिन पिक्चर्स प्रोडक्शनच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन डेब्यू दिग्दर्शक हितेश भाटिया यांनी केले आहे. चित्रपट रितेश सिधवानी, फरहान अख्तर, हनी त्रेहान, अभिषेक चौबे यांच्याद्वारे निर्मित असून कासिम जगमगिया यांची सह-निर्मिती आहे.

Excel Entertainment unveils first look of film 'Sharmaji Namkeen'

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment